शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

आपले सरकार केंद्र असूनही दाखल्यांसाठी पायपीट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2021 11:03 IST

Shegoan News : वर्षाकाठी लाखो रूपये खर्च होऊन ही विविध दाखल्यासाठी  ग्रामीण जनतेची पायपीट सुरूच आहे.

- अनिल उंबरकार लोकमत न्यूज नेटवर्कशेगाव : आपले सरकार सेवा केंद्रासाठी ग्रामपंचायतीकडून वर्षाकाठी लाखो रूपये खर्च होऊन ही विविध दाखल्यासाठी  ग्रामीण जनतेची पायपीट सुरूच आहे. शेगाव तालुक्यातील २९ केंद्रासाठी साडेतीन वर्षात एक कोटी ४१ लाख ६५ हजार रूपये ग्रामपंचायतींना १४ व्या वित्त आयोगाच्या निधीतून खर्च द्यावा लागला. शेगाव तालुक्यात ४६ ग्रामपंचायत अंतर्गत कंत्राटदार कंपनीचे अधिनस्त २९ आपले सरकार सेवा केंद्र सुरू करण्यात आली. संबंधित कंत्राटी कंपनीत त्या केंद्रात २९ संगणक चालक आहेत. महिन्याला १४ व्या वित्त आयोगाच्या निधीतून १,२३,३३१ रुपये ग्रामपंचायतीकडून कंपनीला अदा करावे लागतात.  एका आपले सरकार सेवा केंद्राचा एक वर्षाचा खर्च १ लाख ४७ हजार ९७२ रुपये असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. 

मोठ्या ग्रामपंचायतींना भुर्दंड  शेगाव तालुक्यातील ४६ ग्रामपंचायतींपैकी तालुक्यात मोठ्या असलेल्या १७ ग्रामपंचायतींनी ८३ लाखांचा भुर्दंड सोसावा लागला आहे.  त्यात अळसना, भोनगाव, चिंचोली, गायगाव बु, गौलखेड,जलंब ,जानोरी, जवळा बु,जवळा प, खेरडा, लासुरा, माटरगाव,पहुरजीरा,शिराजगाव,टाकळी विरो, तीत्रव,तरोडा कसबा या ग्रामपंचायतींना प्रत्येकी ४,९३,२४० रुपयांचा आपले सरकार केंद्राचा भार उचलावा लागला. 

सुविधांची तपासणी आवश्यक  ग्रामपंचायत स्तरावरील आपले सरकार सेवा केंद्राचा नियमित सुरू ठेवण्यासाठी आवश्यक नेट सेवा,संगणक संच व इतर सुविधा अपडेट व प्रभावीपणे असावी,यासाठी शासनस्तरावरून प्रयत्न होणे गरजेचे आहे. प्रत्येक ग्रामपंचायतीच्या ठिकाणी आपले सरकार सेवा केंद्रांतर्गत जनतेला सुविधा मिळते की नाही याबाबत तपासणी होणे सुद्धा आवश्यक  आहे.

टॅग्स :Shegaonशेगावbuldhanaबुलडाणा