चोरपांग्रा (लोणार, जि. बुलडाणा) : लोणार तालुक्यातील चोरपांग्रा येथे एका घराची भिंत पडून दोन चिमुकले जखमी झाले. तर एक बकरी ठार झाल्याची घटना १९ ऑक्टोबर रोजी सकाळी ५.३0 वाजता घडली. यासंदर्भात सविस्तर वृत्त असे की, मौजे चोरपांग्रा येथे ज्ञानदेव अमृता इंगळे यांच्या घराची आज सकाळच्या सुमारास अचानक भिंत कोसळली. यामध्ये अजय गजानन इंगळे (६), अमर गजानन इंगळे (५) हे दोन चिमुकले जखमी झाले आहेत. त्याचबरोबर एक बकरी ठार झाली आहे; तसेच ज्ञानदेव इंगळे यांच्या घराचे नुकसान झाले असून, घरातील काही संसारपयोगी साहित्याचेही नुकसान झाले आहे. ज्ञानदेव इंगळे यांना प्रशासनाच्यावतीने तत्काळ नुकसान भरती देण्यात यावी, अशी मागणी गावकर्यांनी केली आहे.
घराची भिंत कोसळून चिमुकले जखमी
By admin | Updated: October 19, 2014 23:57 IST