शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

अवकाळी नुकसानाच्या मदतीची प्रतीक्षाच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2016 02:37 IST

अर्थसंकल्पीय अधिवेशन; दुष्काळ व पाणीटंचाइसाठी हवा वाढीव निधी.

बुलडाणा: अवकाळी पाऊस, गारपीट व दुष्काळ अशा तिहेरी संकटात सापडलेल्या शेतकर्‍यांना राज्य शासनाकडून मदतीची आस आहे. या पृष्ठभूमीवर बुधवारपासून सुरू होणार्‍या अर्थसंकल्पीय अधिवेशनाकडून लोकांच्या अपेक्षा उंचावल्या आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील आमदारांनी पक्षभेद विसरून शासनावर दबाव निर्माण केल्यास आपद्ग्रस्त शेतकर्‍यांना मदतीचे वाटप होण्याचा मार्ग सुकर होईल. जिल्हय़ातील बुलडाणा, चिखली, मोताळा, मेहकर, लोणार व देऊळगावराजा या घाटावरील तालुक्यांसोबतच मोताळा, खामगाव या दोन तालुक्यांनाही अवकाळी पावसाचा मोठा फटका बसला. कांदा, गहू, हरभरा, मका, केळी, संत्रा, डाळिंब, भाजीपाला व इतर पिके या अवकाळी पावसामुळे बाधित झाली असून, सर्वाधिक नुकसान चिखली तालुक्यात झाले आहे. त्या खालोखाल मेहकर व मोताळा तालुक्याला या अवकाळी पावसाचा फटका बसला आहे. सद्यस्थितीत कांदा बी तसेच कांदा पीक हे फुलोरा अवस्थेत असून, अवकाळी पावसामुळे हे पीक पूर्णपणे झोपले आहे. त्यामुळे शेतकर्‍यांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले. गहू पीक पक्व अवस्थेत असून, शेतकरी या पिकाच्या काढणीसाठीच व्यस्त असताना अवकाळी गारपिटीमुळे हे पीकसुद्धा हातातून गेले आहे. मका, हरभरा व भाजीपाला या सोबतच संत्रा आणि डाळिंब फळबागा अवकाळी पावसामुळे प्रभावित झाल्या आहेत. यामुळे मदतीची घोषणा लवकर होऊन त्याच वेगाने वाटप झाले तर शेतकर्‍यांना दिलासा मिळेल. सन २0१३ च्या मदतीचा निधी येण्यासाठी २0१६ उजाडत असेल तर यासंदर्भातही शासनाचे लक्ष वेधून प्रशासकीय गतिमानतेचा प्रश्न आमदारांनी उपस्थित केला पाहिजे.