शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
5
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
6
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
7
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
8
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
9
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
10
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
11
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
12
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
13
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
14
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
15
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
17
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
18
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
19
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
20
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

३५ हजार क्विंटल तूर मोजमापाच्या प्रतीक्षेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2017 01:15 IST

महिनाभरात ७ हजार क्विंटल तुरीचे मोजमाप

लोकमत न्यूज नेटवर्कशेगाव : येथील नाफेड केंद्राअंतर्गत सुरु असलेल्या तुरीच्या मोजमापाला वेग आलेला आहे. एका महिन्यात ७ हजार क्विंटल तुरीचे मोजमाप झाले असून टोकण देण्यात आलेल्या ३५ हजार ४३६ क्विंटल तूर मोजमापाच्या प्रतिक्षेत आहे.नाफेडव्दारा येथील कृषी बाजार समितीच्या स्व.गजाननदादा पाटील यार्डात तुरीचे मोजमाप सुरु आहे. मागील काही दिवसात या केंद्रावर झालेल्या प्रकारामुळे प्रशासनाने या केंद्रांच्या प्रक्रियेत मोठे बदल घडवले असून शेतकऱ्यांना आधी टोकन वाटप व नंतर दूरध्वनीद्वारे बोलावून त्यांच्या तुरीचे मोजमाप होत असल्याने शेतकऱ्यांचाही त्रास वाचला आहे. शिवाय आर्थिक झळही कमी झाली आहे. मात्र टोकन प्राप्त करून घेण्यासाठी बाजार समितीच्या कार्यालयात शेतकऱ्यांची होणारी गर्दी पाहता बाजार समितीने शेतकऱ्यांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आणि उन्हापासून बचावासाठी मंडप उभारले आहे. सकाळी ११ वाजतापासून सायंकाळी ५ वाजेपर्यंत टोकन वाटपाची प्रक्रिया सुरु आहे. १५ मे ते २३ मार्चपर्यंत २ हजार ६२७ शेतकऱ्यांच्या ३५ हजार ४३६ क्विंटल तुरीला टोकन वाटप करण्यात आले आहे. तर यापैकी २३ मार्चपर्यंत ७ हजार २९१ क्विंटल तुरीचे मोजमाप झाले आहे अशी माहिती बाजार समितीकडून देण्यात आली आहे.