शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

दहावीच्या विद्यार्थ्यांना गुणपत्रिकांची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2020 11:17 IST

विद्यार्थ्यांना अद्यापही गुणपत्रिकांचे वितरण करण्यात आलेले नाही.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने मार्च २०१९ मध्ये घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल २९ जुलै रोजी आॅनलाईन जाहीर करण्यात आला आहे. मात्र, विद्यार्थ्यांना अद्यापही गुणपत्रिकांचे वितरण करण्यात आलेले नाही. त्यामुळे, विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्यासाठी आणखी प्रतीक्षा करावी लागणार आहे.यावर्षी बुलडाणा जिल्ह्याचा इयत्ता दहावीचा निकाल बुलडाणा ९६.१० टक्के लागला आहे. या परीक्षेस जिल्ह्यातून एकूण ४३ हजार ९२२ विद्यार्थी प्रवेशित झाले होते. त्यापैकी ४३ हजार ६६९ विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष परीक्षा दिली. परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांपैकी ४१ हजार ४१९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने शाळा, महाविद्यालये बंद आहेत. त्यामुळे, शाळांचे नियोजन विस्कळीत झाले आहे.जुनमध्ये लागणारा निकाल २९ जुलै रोजी जाहीर करण्यात आला. आॅनलाईन निकाल जाहीर झाल्यानंतर चार ते पाच दिवसात गुणपत्रिका विद्यार्थ्यांना मिळणे अपेक्षीत होते. मात्र, आॅनलाईन निकाल जाहीर झाल्यानंतर तब्बल दहा दिवसानंतरही विद्यार्थ्यांना गुणपत्रिका मिळाल्या नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे, विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्यासाठी अडचणींचा सामना करावा लागत आहे.

प्रवेश प्रकीयेस विलंबजिल्हाभरात आयटीयआयच्या प्रवेशास प्रारंभ झाला आहे. मात्र, गुणपत्रिका नसल्याने विद्यार्थी प्रवेश घेउ शकत नसल्याचे चित्र आहे. तसेच जिल्हास्तरावर शिक्षण विभागही विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकांची प्रतीक्षा करीत असून त्यानंतरच ११वी प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर करण्यात येणार आहे. एरव्ही आॅनलाईन निकाल जाहीर झाल्यानंतर चार ते पाच दिवसांनी गुणपत्रिका येत होत्या. मात्र, यावर्षी कोरोनामुळे नियोजन विस्कळीत झाल्याचे चित्र आहे.दहावी निकाल जाहीर करण्यास दोन महिन्यांचा विलंब झाला होता. महाविद्यालयांनी आॅनलाईन प्रवेश प्रक्रीया सुरू केली असली तरी जो पर्यंत कागदपत्रे सादर करण्यात येत नाहीत, तो पर्यंत विद्यार्थ्यांचा प्रवेश होत नाही. त्यामुळे गुणपत्रिकांची विद्यार्थ्यांना प्रतिक्षा आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणाEducation Sectorशिक्षण क्षेत्रSSC Resultदहावीचा निकाल