शहरं
Join us  
Trending Stories
1
महिलांनी पाय धुतले, दृष्ट काढली, दुग्धाभिषेक केला; फलटणमध्ये रणजितसिंह निंबाळकरांना अश्रू अनावर
2
नेपाळमध्ये हिमस्खलनात सात जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
3
रशियाच्या मदतीने इराण ८ नवीन अणुऊर्जा प्रकल्प बांधणार, असा करार दोन्ही देशांमध्ये झाला
4
"मराठी माझी माय, उत्तर भारत मावशी..; एक वेळ आई मेली तरी चालेल, पण मावशी जगली पाहिजे"
5
फक्त २००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल 'कोट्यधीश'; कंपाऊंडिंगचे गणित समजून घ्या
6
रेल्वे प्रवासामध्ये शुगर नाही वाढणार, आता डायबेटिक फूड मिळणार, कोणत्या ट्रेनमध्ये असणार सुविधा
7
'घोळ कुणी घातला आणि फायदा कुणाला झाला, हे आता लपवणं शक्यच नाही'; राज ठाकरेंच्या आमदाराचं थेट मुद्द्यावर बोट
8
१ कोटींचा पगार, ६० सेकंदात व्हिसा रिजेक्ट; इंजिनिअरने धक्कादायक अनुभव सांगितला, ते तीन प्रश्नही केले शेअर
9
आजीला ‘हार्ट अटॅक’...घरच्यांनी लपवली गोष्ट; भारताच्या लेकीनं फिल्डिंगच्या जोरावर फिरवली मॅच!
10
Railway Accident: मुंब्रा रेल्वे अपघात प्रकरणी दोन इंजिनिअरवर गुन्हा दाखल, एफआरआयमध्ये काय?
11
चिनी एअरलाइन्समध्ये विवाहित एअर होस्टेस आता 'एअर आंटी' झाली, मोठा वाद सुरू झाला
12
'गप्पू आणि चप्पूपासून बिहारला वाचवायचे आहे'; 'पप्पू-टप्पू-अप्पू'च्या टीकेनंतर अखिलेश यादवांचा पलटवार
13
Travel : भारतापासून अवघ्या ४ तासांवर आहे 'हा' देश; शिमला-मनालीच्या बजेटमध्ये करू शकता परदेशवारी!
14
Amol Majumdar : भारतीय महिला संघाच्या यशामागचा हिरो अन् त्याचं ‘सेम टू सेम’ हिटमॅन स्टाईल सेलिब्रेशन
15
"मी म्हणालो हॉटेलवरून उडी मारेन अन् स्वतःला संपवून टाकेन", बालाजी कल्याणकरांच्या डोक्यात काय सुरू होतं?
16
तुम्हालाही 'हा' मेसेज आलाय? ताबडतोब डिलीट करा, अन्यथा रिकामी होऊ शकतं तुमचं बँक अकाऊंट!
17
३ वर्षाची असताना वडिलांचं निधन, आई रोजंदारीवर १५०० रुपये कमवायची; रेणुका ठाकूरचा संघर्षमय प्रवास
18
सहा महिन्यात एक लाखाचे ९ लाख! १० रुपयांचा शेअर आता 'शतका'च्या उंबरठ्यावर; कंपनीचं नावही आहे खास!
19
देशभरात भीषण अपघातांची मालिका; आंध्र प्रदेश, तेलंगणा, राजस्थानात 60 जणांचा बळी, अनेक जखमी
20
डोनाल्ड ट्रम्प यांनी न्युक्लिअर टेस्टिंगमध्ये घेतलं चीनचं नाव; आता ड्रॅगनने दिलं थेट उत्तर! म्हणाले...

शेतकरी तुरीच्या चुकाऱ्यांच्या प्रतीक्षेत!

By admin | Updated: May 25, 2017 01:53 IST

खरीप हंगामाच्या तोंडावर शेतकरी आर्थिक संकटात

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव जामोद : महाराष्ट्र शासनाने सुरू केलेल्या तूर खरेदीचे चुकारे अद्यापही न झाल्यामुळे ऐन खरीप हंगामाच्या तोंडावर शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. पेरणीपूर्व मशागत तथा बी-बियाणे व खते खरेदीकरिता शेतकऱ्यांकडे पैसा नसल्यामुळे येणाऱ्या खरीप हंगामाचे स्वप्न अंधकारमय दिसत आहे. या तालुक्यातील १५९३ शेतकऱ्यांनी २३ मे पर्यंत ३४ हजार ५५९.७१ क्विंटल तूर शासनाला दिली आहे. ज्यांचे चुकारे अद्याप मिळाले नाहीत.जळगाव जामोद येथील तूर खरेदी केंद्रावर आतापर्यंत केंद्र शासनाच्या भारतीय खाद्य निगम (एफसीआय) च्या खरेदीसह एकूण ६७ हजार ५५६.२२ क्विंटल तूर खरेदी करण्यात आली. यामधील एफसीआयमार्फत केंद्र शासनाने खरेदी केलेल्या ३३०९६.५१ क्विंटल तुरीचे चुकारे खरेदी विक्री संघामार्फत शेतकऱ्यांना धनादेशाद्वारे देण्यात आले. सदर तूर खरेदी ११ जानेवारी ते २१ एप्रिलपर्यंत करण्यात आली. त्यानंतर २२ एप्रिलपासून महाराष्ट्र शासनाची तूर खरेदी सुरू झाली. त्या माध्यमातून २१ मे पर्यंत २८९३७.२३ क्विंटल तुरीची खरेदी झाली. त्यानंतर पुन्हा २२ मे पासून नाफेडमार्फत तूर खरेदी करण्यात आली. यामध्ये आतापर्यंत ५५२२.४८ क्विंटल तुरीची खरेदी करण्यात आली. त्यामुळे २२ एप्रिलपासून, तर २३ मे पर्यंत तब्बल ३८५५९.७१ क्विंटल तूर खरेदी या केंद्रावर झाली. सदर खरेदी १५९३ शेतकऱ्यांकडून करण्यात आली.शासनाने ठरवून दिलेल्या ५०५० रुपये प्रतिक्विंटल या हमीभावाप्रमाणे जवळपास १७.५० कोटी रुपये तूर उत्पादक शेतकऱ्यांचे शासनाकडे थकले आहेत. त्यामुळे येणाऱ्या हंगामाची तयारी करताना पेरणीपूर्व मशागत व रासायनिक खते बी-बियाणे कशी खरेदी करायची हा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. तुरीच्या चुकाऱ्याला अजून किती दिवस प्रतीक्षा करावी लागेल, हे कोणीही सांगू शकत नाही. सद्यस्थितीत कृषी उत्पन्न बाजार समिती यार्डामध्ये समितीमार्फत टोकन देऊन शेतकऱ्यांची तूर खरेदी सुरू आहे, तर मोजणीनंतर सदर तूर ही शासनाने ठरवून दिलेल्या धुळे आणि चाळीसगाव येथील वेअर हाऊसला पोच करणे आणि त्या ठिकाणी मालाची नोंद करून पावती आणण्याचे काम स्थानिक खरेदी विक्री संघामार्फत केले जाते. सदर पावत्या डीएमओ म्हणजे जिल्हा मार्केटिंग अधिकारी बुलडाणा यांच्याकडे पाठविल्या जातात आणि डीएमओ मार्फत सदर पावत्या मुंबईला पाठविण्यात येतात. या प्रक्रियेला तब्बल १५ दिवसांचा कालावधी जातो. त्यामुळे माप झालेल्या शेतकऱ्यांना तुरीचे चुकारे तत्काळ मिळणे आवश्यक झाले आहे. अद्यापही २४०० शेतकरी तूर मोजणीच्या प्रतीक्षेततूर मोजणी केंद्रावर आतापर्यंत २४०० शेतकऱ्यांनी आपली नोंदणी केली आहे. त्यामध्ये २२ ते २३ मे अशा दोन दिवसांत केवळ २६२ शेतकऱ्यांच्या तुरीचे माप करण्यात आले आहे, तर उर्वरित शेतकरी मापाच्या प्रतिक्षेत आहेत. तूर खरेदीची अंतिम मुदत ३१ मे पर्यंत असून, तोपर्यंत मोजमाप होण्याची चिन्ह दिसत नसल्याने ती मुदतही शासनाला वाढवावी लागणार आहे. मात्र, त्यात पावसाने घाई केल्यास शेतकरी पूर्णत: खचून जाणार आहे, एवढे मात्र निश्चित.