शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

वैनगंंगा-नळगंगा नदीजोड प्रकल्पाला गती देणार - जयंत पाटील

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2021 05:03 IST

६० टीएमसी पाण्याचा मूळ प्रस्ताव मंजूर होणे गरजेचे

बुलडाणा : वैनगंगा-नळगंगा नदीजोड प्रकल्पाला गती देण्याचा आमचा प्रयत्न आहे. तो एकदा कागदावर मंजूर झाला की, त्याचे पाणी विदर्भात कशा पद्धतीने खेळवायचे, हे आपल्या हातात आहे. प्रामुख्याने या प्रकल्पांतर्गत ६० टीएमसी पाणी आणणे आणि विदर्भातील जिल्ह्यात टप्प्याटप्प्याने वाटप होणे हा जो मूळ प्रस्ताव आहे, तो मंजूर होणे आवश्यक आहे, असे जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी बुलडाणा येथे स्पष्ट केले. या प्रकल्पासोबतच पैनगंगा नदीही त्यास जोडल्यास बुलडाणा जिल्ह्यातील घाटावरील तालुक्यांसह वाशिम, यवतमाळसह अन्य जिल्ह्यांनाही त्याचा लाभ होईल. त्यादृष्टीने प्रयत्न करण्याची मागणी होत आहे. माँ जिजाऊ जलसमृद्धी नदीजोड प्रकल्प समितीही त्यासाठी आग्रही आहे. त्यासंदर्भाने पाटील यांना विचारणा केली असता त्यांनी प्रस्तुत स्पष्टाकरण दिले. मुख्यत्वे ६० टीएमसी पाणी आणण्याचे आपले प्रयत्न आहेत. त्याचा पाठपुरावा सुरू आहे. त्यात निश्चितच आपण एका चांगल्या निष्कर्षाप्रत येऊ, असेही ते पुढे म्हणाले.सिंचन अनुशेष दूर करण्यासाठी बैठकाअमरावती विभागातील सिंचन अनुशेष दूर करण्यासाठी मधल्या काळात फारसे यश आले नाही. त्यात अडचणी आल्यात. तो दूर करण्यासाठी सध्या जिल्हानिहाय आपण बैठका घेत आहोत. विभागातील प्रकल्पांच्या कामांना गती यावी, हा आढावा बैठकांचा मूळ उद्देश आहे. सोबतच अडचणी दूर होऊन उपलब्ध निधी खर्च व्हावा यासाठी आपण प्रयत्नरत असल्याचेही ते म्हणाले.जिगावसाठी केंद्राच्या निधीची प्रतीक्षाजिगाव प्रकल्पाच्या कामालाही गती देणार असून, जिगाव प्रकल्प पूर्णत्वाच्या दृष्टीने केंद्राकडून उपलब्ध होणार जवळपास २०० कोटी रुपयांचा निधी मधल्या दोन वर्षांत उपलब्ध झाला नाही. तो येत्या काळात मिळेल, अशी आशा आहे. यासोबतच पुनर्वसन व भूसंपादनाचे काही जटिल प्रश्न मार्गी लावून येत्या काळात किमान सात टीएमसी पाणी जिगाव प्रकल्पात साठविण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू असल्याचे पाटील म्हणाले.

टॅग्स :Jayant Patilजयंत पाटील