बुलडाणा : लोकशाहीतील सर्वात महत्त्वाचा हक्क बजावण्याचा मतदानाचा, विधानसभा निवडणूकीत मतदान करण्याचा आजचा दिवस आहे. बुलडाणा जिल्ह्यातील सात विधानसभा मतदारसंघांसाठी आज १५ ऑक्टोबर रोजी मतदान होणार असून, यासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे. मतदान निर्भय वातावरणात पार पडावे, यासाठी मतदान केंद्र परिसरात कलम १४४ लागू करण्यात आले आहे. मतदान केंद्रापासून २00 मीटरच्या आ त मते मिळविण्यासाठी प्रचार करता येणार नाही. लोकशाहीच्या मजबूतीसाठी मतदानामध्ये सहभागी होणे आवश्यक असून याची जाणीव ठेवून मतदारांनी मतदान केंद्रावर जाऊन आ पले मत नोंदवावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.जिल्हाधिकारी किरण कुरूंदकर यांनी मतदानाची प्रक्रिया शांततेत पूर्ण करण्यासाठी नागरिकांनीही प्रशासनाला सहकार्य करण्याचे अवाहन केले आहे. कायद्याचे उल्लंघन करणार्यांवर कडक कारवाई करण्याचे आदेश यंत्रणेने दिले असल्याचे त्यांनी सांगीतले. जिल्हा पोलिस अधीक्षक श्यामराव दिघावकर यांनी नागरिकांना निर्भय व निर्भीड मतदानाच्या अधिकाराचा वापर करण्याचे अवाहन केले आहे. कुठल्याही अफवांवर विश्वास न ठेवता कायद्याचे पालन करावे. कुठेही अनुचित प्रकार होत असेल, तर पोलिसांना कळवावा. म तदारांना आमिष दाखविण्याच्या प्रकारावरही पोलिसांचे लक्ष असून, असा प्रकार कुठे होत असेल, तर तो व्हिडीओ चित्रीकरणात समोर येईलच, असे त्यांनी स्पष्ट केले.
* सैन्यदलातील मतदारांची संख्या ३ हजार ९९७एकूण सात विधानसभा मतदारसंघांमध्ये सैन्यदलातील ३९९७ मतदार आहेत. त्यामध्ये २८११ पुरूष, तर ११८६ महिला सैनिकांचा समावेश आहे.मतदान एक दृष्टीक्षेप
एकूण उमेदवार १0१एकूण मतदार १८,१९,१३६ पुरुष मतदार ९,९२,५४८ महिला मतदार ८,८0,५८३ मतदान केंद्रे १,२७0 संवेदनशील केंद्रे १0८