बुलडाणा : जिल्ह्यातील सातही मतदारसंघांमध्ये आज विधानसभेसाठी मतदानाची टक्केवारी अंतिम क्षणी ७0 टक्क्यांपर्यंत पोहोचल्याचा अंदाज प्रशासकीय सूत्रांनी व्यक्त केला आहे.विधानसभा निवडणुकीमध्ये मतदानासाठी मतदारांमध्ये प्रचंड उत्साह दिसून आला. मतदान सुरू झाल्यापासूनच केंद्रांवर मतदारांनी गर्दी केली होती. हा उत्साह दुपारपर्यंतही कायम राहिला व संध्याकाळी त्यामध्ये वाढ होत गेली. पाच वाजेपर्यंत सातही विधानसभा म तदारसंघांमध्ये ५३.५७ टक्के मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला होता. ही टक्केवारी अखेरीस ७0 टक्क्यांपर्यंत पोहोचली, असा अंदाज आहे. वाढलेल्या टक्केवारीमुळे सातही म तदारसंघांमध्ये प्रचंड चुरस निर्माण झालेली आहे. * बहिष्कार संपलाजिल्ह्यातील १७ गावांनी मतदानावर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला होता. मात्र, बहिष्कार मागे घेत या सर्व गावांतील ग्रामस्थांनी मतदानात सहभाग नोंदविला. या गावांमध्ये प्रशासनाने संपर्क करून ग्रामस्थांची समजूत काढली.* केवळ सहा मतदारांनी केले मतदानचिखली तालुक्यातील बोराळा येथे १६६ मतदारांपैकी केवळ सहा मतदारांनीच मतदान केले. बोराळा गावातील समस्यांकडे प्रशासन आणि लोकप्रतिनिधींचे सातत्याने दुर्लक्ष झाले आहे. येथे विकासकामे होत नाही, अशी तक्रार मतदानात सहभागी न झालेल्या गावकर्यांची आहे.*उशिरापर्यंत मतदानमलकापूर मतदारसंघातील नांदुरा खुर्द येथे पाचनंतर मतदारांनी केंद्रांवर धाव घेतल्याने येथील मतदान उशिरापर्यंत सुरू होते. शेगाव तालुक्यातील मोरगाव डिग्रस येथील बहिष्कार दुपारी मागे घेण्याचा निर्णय झाला. त्यामुळे मतदान उशिरा सुरू झाले.* इव्हीएममध्ये बिघाडबुलडाणा मतदारसंघातील मोताळा तालुक्याच्या बोराखेडी येथे इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीनचे एक बटण दाबले जात नव्हते. त्यामुळे सकाळी ८:२५ ला मतदान बंद करून ९:0५ वाजता पुन्हा मतदान सुरू करण्यात आले. सोनाळा येथेही एका इव्हीएममध्ये बिघाड झाला होता. खामगाव मतदारसंघातील वहाळा व शेगाव तालुक्यातील वरुड येथेही इव्हीएम काही काळ बंद पडले होते. मात्र, त्वरित दुरुस्त करण्यात आले.
मतदान सत्तरीच्या उंबरठय़ावर
By admin | Updated: October 16, 2014 00:51 IST