बुलडाणा : विधानसभा निवडणुकीसाठी वापरण्यात येणार्या इलेक्ट्रॉनिक्स मशीनचे विधानसभा मतदारसंघनिहाय प्रथमस्तरीय सरमिसळ प्रक्रिया आज जिल्हाधिकारी कार्यालयाचे सभागृहात निवडणूक निरीक्षक सी. सी. निरंजन, जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी किरण कुरुंदकर राजकीय पक्षाचे उमेदवार यांच्या उपस्थितीत संपन्न झाली. यावेळी उमेदवाराच्या वतीने काँग्रेस पक्षाचे शहर कमिटी अध्यक्ष सुनील सपकाळ, राष्ट्रवादी काँग्रेस, एस. टी. सोनोने, शिवसेना पक्षाचे शांताराम जगताप, भाजपा शहर अध्यक्ष अमोल बल्लाळ, मनसे पक्षाचे देवेंद्र खोत, अपर जिल्हाधिकारी चिंतामणी जोशी, उपजिल्हा निवडणूक अधिकारी रमेश घेवंदे, जिल्हा सूचना अधिकारी उत्तम चव्हाण, तहसीलदार सुनील शेळके, सहाय्यक करमणूक कर अधिकारी श्रीराम सोळंके उपस्थित होते. जिल्हा निवडणूक अधिकारी यांनी राजकीय पक्षासाठी प्रचार साहित्याच्या बाबत विविध वस्तूंच्या बाजार भावाची माहिती देण्यात आली.
मतदान यंत्राची सरमिसळ
By admin | Updated: September 26, 2014 00:12 IST