मेहकर : मेहकर तालुक्यातील १० गावातील ३३ जागेच्या पोटनिवडणुकीसाठी २५ फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे. या निवडणुकीमध्ये नागरीकांनी आदर्श आचारसंहीतेचे पालन करावे, असे आवाहन तहसिलदार संतोष काकडे यांनी केले आहे. मेहकर तालुक्यातील घाटनांद्रा ३, मोहना खुर्द ३, घुटी ६, वर्दडी वैराळ १, साब्रा ३, वडाळी ५, वागदेव ८, लव्हाळा ३, माळेगांव १ अशा १० गावातील ३३ जागेसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. ५ फेब्रुवारी ते १० फेब्रुवारी पर्यंत नामनिर्देशनपत्र घेण्यात येणार आहेत. तर २५ फेब्रुवारी रोजी मतदान व २६ फेब्रुवारी रोजी मतमोजणी होणार आहे. यामध्ये आरक्षीत जागांवर निवडणूक लढविणाºया उमेदवारांना नामनिर्देशनपत्रासोबत जातवैधता प्रमाणपत्राऐवजी हमीपत्र घेण्याच्या सवलतीस शासनाच्या ग्रामविकास विभागाकडून ३१ डिसेंबर २०१७ मुदतवाढ न देण्यात आल्याने या निवडणुकीसाठी आरक्षीत जागांवर निवडणुका लढविणाºया उमेदवारांना नामनिर्देशनपत्रासोबत जात प्रमाणपत्र तसेच जात वैधता प्रमाणपत्र सादर करणे गरजेचे आहे, अशी माहिती तहसिलदार संतोष काकडे यांनी दिली. ज्या गावामध्ये ग्रा.पं. ची पोटनिवडणूक असेल त्या गावच्या संबधीत क्षेत्रामध्येच आचारसंहिता लागू राहिल असेही त्यांनी सांगीतले. (तालुका प्रतिनिधी)
मेहकर तालुक्यातील १० गावातील ३३ जागेच्या पोटनिवडणुकीसाठी २५ फेब्रुवारीला मतदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2018 15:37 IST
मेहकर : मेहकर तालुक्यातील १० गावातील ३३ जागेच्या पोटनिवडणुकीसाठी २५ फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे. या निवडणुकीमध्ये नागरीकांनी आदर्श आचारसंहीतेचे पालन करावे, असे आवाहन तहसिलदार संतोष काकडे यांनी केले आहे. मेहकर तालुक्यातील घाटनांद्रा ३, मोहना खुर्द ३, घुटी ६, वर्दडी वैराळ १, साब्रा ३, वडाळी ५, वागदेव ८, लव्हाळा ३, ...
मेहकर तालुक्यातील १० गावातील ३३ जागेच्या पोटनिवडणुकीसाठी २५ फेब्रुवारीला मतदान
ठळक मुद्देघाटनांद्रा ३, मोहना खुर्द ३, घुटी ६, वर्दडी वैराळ १, साब्रा ३, वडाळी ५, वागदेव ८, लव्हाळा ३, माळेगांव १ अशा १० गावातील ३३ जागेसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे.५ फेब्रुवारी ते १० फेब्रुवारी पर्यंत नामनिर्देशनपत्र घेण्यात येणार आहेत. २५ फेब्रुवारी रोजी मतदान व २६ फेब्रुवारी रोजी मतमोजणी होणार आहे.