दुसरबीड : येथील नारायणराव नागरे महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागांतर्गत २५ जानेवारी रोजी राष्ट्रीय मतदार दिनाचे औचित्य साधून मतदान जनजागृती करण्यात आली.
प्राचार्य तथा रासेयो कार्यक्रमाधिकारी डॉ. विजय नागरे यांच्या अध्यक्षतेखाली महाविद्यालय परिसरात हिरवा झेंडा दाखवून मतदार जनजागृती रॅली काढण्यात आली. यावेळी प्राचार्य डॉ. विजय नागरे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी गजानन राठोड, विलास राठोड, प्रा. डॉ. गणेश घुगे, प्रा. डॉ. दीपक देशमाने, प्रा. सानप, प्रा. वाघ, प्रा. तारे, प्रा. शिंदे, प्रा. काळुसे, प्रा. दराडे, रासेयो सहकार्यक्रम अधिकारी, प्रा. मिलिंद गवई, प्रा. एकनाथ हरकळ, प्रा. युनूस, प्रा.रेणुका देशमुख, नरेंद्र गवई, गजानन मुंडे, पंढरे, अनिल गायकवाड, अनिल रणमळे, रासेयो प्रतिनिधी पूजा देशमुख, शिवशंकर मुळे, ऋषिकेश आटोळे, बाबासाहेब सरकटे यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते.