शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
5
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
6
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
7
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
8
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
9
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
10
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
11
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
12
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
13
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
14
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
15
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
16
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
17
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

भयमुक्त वातावरणात मतदारांनी मतदान करावे

By admin | Updated: October 15, 2014 00:38 IST

बुलडाणा जिल्हाधिकारी कुरुंदकर यांचे आवाहन.

बुलडाणा : प्रशासकीय यंत्रणा उद्या १५ ऑक्टोबर रोजी होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीच्या मतदानासाठी सज्ज झाली आहे. मतदारांनी भयमुक्त वातावरणात मतदान करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी किरण कुरूंदकर यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत केले.जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्थेची स्थिती कायम राखण्यासाठी पाच हजार पोलिस कर्मचारी-अधिकारी तैनात करण्यात आल्याची माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक श्यामराव दिघावकर यांनी यावेळी दिली. यामध्ये २0५ अधिकारी, ४६५ कर्मचारी, २२६ महिला पोलिस, ९00 पुरूष होमगार्ड, १00 महिला होमगार्डचा समावेश आहे. त्यासाठी २२५ वाहनांची व्यव्यस्था करण्यात आली आहे. सातही मतदारसंघांमध्ये संपर्कासाठी २00 संचांच्या माध्यमातून वायरलेस यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. २३ गावांमध्ये संपर्क होत नसल्यामुळे तेथे लँडलाइन फोनची व्यवस्था करण्यात आली आहे. जिल्ह्याच्या सीमेवर १४ ठिकाणी चेकपोस्ट, तर २0 स्थिर आणि २२ फिरती पथके नेमण्यात आली आहेत. निवडणूक काळात कायदा व सुव्यवस्था धोक्यात आणण्याची शक्यता असलेल्या ४0५ संशयितांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली, तर, १ हजार ७८ लोकांविरूद्ध अन्य गुन्हे दाखल करण्यात आले. प्रचारकाळात उत्पादन शुल्क व पोलिस विभागाने केलेल्या कारवाईत आतापर्यंत अवैध दारूप्रकरणी १0५ गुन्हे दाखल करण्यात आल्याची माहिती यावेळी देण्यात आली. पत्रकार परिषदेला सहायक निवडणूक अधिकारी रमेश घेवंदे, महिती अधिकारी दैठणकर आदी अधिकारी उपस्थित होते. *जलदगती कारवाई एखाद्या ठिकाणी कायदा व सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्यासाठी सेक्टर पेट्रोलिंगची व्यवस्था करण्यात आली आहे. एसआरपीच्या तीन प्लॅटून राखीव ठेवण्यात आल्या आहेत. घटनस्थळावर पाच मिनिटांत यंत्रणा पोहोचेल, अशी व्यवस्था करण्यात आली आहे.

*४३५ शस्त्र केले जमाजिल्ह्यात ५३६ व्यक्तींकडे शस्त्रपरवाना आहे. कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने ४३५ शस्त्रे जमा करण्यात आली आहेत. एक अवैध शस्त्र जप्त करण्यात आले आहे.