शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

मतदारांच्या ‘डोअर टू डोअर’ भेटीला उमेदवारांचे प्राधान्य!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2017 01:27 IST

अमोल ठाकरे। लोकमत न्यूज नेटवर्कसंग्रामपूर: तालुक्यातील २१ ग्रामपंचायतीच्या निवडणुकांचा राजकीय आखाडा दिवसेंदिवस चांगलाच तापू लागला आहे. यामध्ये काकनवाडा येथील ग्रामपंचायतीचे सरपंच अविरोध झाले असून, दोन ग्रामपंचायतींकरिता सरपंचपदाकरिता अर्जच न आल्यामुळे दोन ग्रामपंचायती रिक्त राहणार असून, १८ सरपंच निवडले जाणार आहेत. यासाठी एकूण २६ हजार ७९८ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. या ...

ठळक मुद्दे २१ ग्रामपंचायतीच्या निवडणुकांचा राजकीय आखाडादिवसेंदिवस चांगलाच तापू लागला आहेवर्चस्व राहावे यासाठी सर्वच राजकीय पक्ष गाव पुढार्‍यांकडून जोरदार फिल्डिंग

अमोल ठाकरे। लोकमत न्यूज नेटवर्कसंग्रामपूर: तालुक्यातील २१ ग्रामपंचायतीच्या निवडणुकांचा राजकीय आखाडा दिवसेंदिवस चांगलाच तापू लागला आहे. यामध्ये काकनवाडा येथील ग्रामपंचायतीचे सरपंच अविरोध झाले असून, दोन ग्रामपंचायतींकरिता सरपंचपदाकरिता अर्जच न आल्यामुळे दोन ग्रामपंचायती रिक्त राहणार असून, १८ सरपंच निवडले जाणार आहेत. यासाठी एकूण २६ हजार ७९८ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. या ग्रामपंचायतीवर आपलेच वर्चस्व राहावे यासाठी सर्वच राजकीय पक्ष गाव पुढार्‍यांकडून जोरदार फिल्डिंग लावली जात आहे.२१ ग्रामपंचायतींकरिता ग्रामपंचायत सदस्यांची संख्या १७३ एवढी असून, यापैकी ८२ सदस्य अविरोध झाले आहेत. तर ८७ सदस्यांचा जागाकरिता २0२ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. एकूण २६ हजार ७९८ मतदार मतदानाचा हक्क बजावणार असून, यामध्ये पुरुष मतदारांची संख्या १४ हजार ५७७ असून, स्त्री मतदारांची संख्या १२ हजार २२१ एवढी आहे. यावर्षी प्रथमच गावचे सरपंच थेट जनतेतून निवडले जाणार आहेत. त्यामुळे सरपंच पदाची निवडणूक ही अत्यंत प्रतिष्ठेची, अटीतटीची होणार आहे. त्यामुळे संपूर्ण गावातील मतदारांची मर्जी सांभाळताना सरपंच पदासाठी बाशिंग बांधलेल्या इच्छुकांची चांगलीच दमछाक होत आहे. काही गावांमध्ये तर सख्खे काका-पुतणे हे सरपंच पदासाठी निवडणूक रिंगणात उतरल्याचे चित्र आहे. सरपंचपदी आपलीच निवड जनतेने करावी त्याकरिता इच्छुक उमेदवार घरोघरी जाऊन आश्‍वासनांची खैरात वाटत आहेत. आतापासूनच रंगीत, संगीत व ओल्या पाटर्य़ांची मेजवानी धुमधडाक्यात सुरू आहे; मात्र मतदार आपल्यालाच निवडून देणार की पराभवाचा धक्का देणार, या चिंतेने सरपंचपदासह सदस्य होण्याचे स्वप्न पाहणार्‍यांची झोप उडाल्याचे चित्र आहे. मतदानाच्या अंतिम तारखेपर्यंत मतदार राजाला आपलेसे कसा करता येईल, त्याचे मत आपल्याच पारड्यात कसे पाडून घेता येईल, यासाठी जोरदार फिल्डिंग लावण्याचे प्रयत्न केले जात आहे. राजकीयदृष्ट्या अत्यंत प्रतिष्ठेच्या व सक्षम अशा तालुक्यातील १८ ग्रामपंचायत निवडणुकीत ग्रामपंचायत ग्रामपंचायतीवर आपल्या पक्षाचा झेंडा फडकला पाहिजे. यासाठी तगडी प्रचार यंत्रणा राबविण्यासह डोअर टू डोअर प्रचार करून मतदारांचे मन वळविण्याचा प्रयत्न केल्या जात आहे.