शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

पीककर्जासाठी शेतकऱ्यांच्या बँकेत फेऱ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2021 04:23 IST

अंढेरा : खरीप हंगामास सुरुवात हाेऊन महिना लाेटला असला तरी अनेक शेतकऱ्यांना अजूनही पीककर्ज मिळालेले नाही़ त्यातच अंढेरा येथील ...

अंढेरा : खरीप हंगामास सुरुवात हाेऊन महिना लाेटला असला तरी अनेक शेतकऱ्यांना अजूनही पीककर्ज मिळालेले नाही़ त्यातच अंढेरा येथील विदर्भ कोकण ग्रामीण बँकेचे शाखाधिकारी सुटीवर गेल्याने शेतकऱ्यांना पीक कर्जासाठी बँकेत फेऱ्या माराव्या लागत आहेत. याकडे वरिष्ठांनी लक्ष देऊन पर्यायी व्यवस्था करण्याची मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे.

विदर्भ कोकण ग्रामीण बँकेची शाखा अंढेरा येथे असून, या शाखेअंतर्गत सेवानगर, पिप्री आंधळे, मेंडगाव, बायगाव, सावखेड नागरे, शिवणी आरमाळ हे गावे येतात. सध्या पेरणीचे दिवस सुरू असताना सगळीकडे पीककर्ज वाटप सुरू आहे. अंढेरा येथे मात्र येथील शाखेचे व्यवस्थापक हे गेल्या पंधरा दिवसांपासून सुटी असल्याने पीक कर्जवाटप रखडलेले आहे़

विदर्भ कोकण ग्रामीण बँकेच्या शाखा व्यवस्थापकांना नव्याने पीक कर्जवाटपाचे अधिकार मिळाले आहेत. शाखा व्यवस्थापक गौरव जगताप सुटीवर असल्याने शेतकऱ्यांना पीककर्जासाठी बँकेत फेऱ्या माराव्या लागत असल्याचे चित्र आहे. नव्याने पीककर्ज मागणीसाठी या भागातील शेतकऱ्यांनी देऊळगाव मही येथील बँकेकडे मागणी केली असता तुमचे कार्यक्षेत्र या बँकेकडे येत नसल्याचे कारण सांगण्यात आले.

अनेक शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट

मृग नक्षत्रात पडलेल्या पावसाच्या बळावर अनेक शेतकऱ्यांनी पेरणी केली हाेती. त्यानंतर दहा ते १५ दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने अनेक शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट आले आहे. तसेच अनेक शेतकऱ्यांच्या पेरण्या खाेळंबल्या आहेत. पीककर्ज मिळेल या आशेवर शेतकऱ्यांनी उसनवारी करून पेरणी केली आहे़ मात्र, महिना लाेटल्यानंतरही शेतकऱ्यांना पीककर्ज मिळत नसल्याचे चित्र आहे. याकडे वरिष्ठांनी लक्ष देण्याची गरज आहे. दरम्यान, याविषयी जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक नरेश हेडाऊ यांच्याशी संपर्क केला असता अंढेरा येथे लवकरच पर्यायी शाखा व्यवस्थापक पाठवण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.

सहायक व्यवस्थापकांकडे दिला प्रभार

परिसरातील शेतकऱ्यांना पीककर्ज मिळण्यासाठी हाेत असलेला विलंब पाहता जिल्हा अग्रणी बॅंकेच्या व्यवस्थापकांनी सहायक व्यवस्थापक विनायक पाठक यांच्याकडे विदर्भ कोकण ग्रामीण बँकेच्या अंढेरा शाखेचा पदभार दिला आहे़ त्यामुळे, शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. पीक कर्जवाटपाची गती वाढवण्याची गरज आहे.