जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव बघता संचारबंदी लागू करण्यात आली आहे. कोरोना प्रतिबंधासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी नगरपालिका क्षेत्रात लाॅकडाऊनही जाहीर केले आहे. प्रत्येकाने मास्कचा वापर करावा, सार्वजनिक ठिकाणी होणारी गर्दी टाळावी असे नियम घालून दिले असताना डोणगाव येथे मात्र सर्रास या नियमांचे उल्लंघन होत असल्याचे दिसून येते आहे. मागील वर्षी कोरोना प्रसार वाढू नये, म्हणून स्थानिक ग्रामपंचायतने पोलीस प्रशासनासोबत घेऊन विनामास्क फिरणाऱ्यांवर कारवाई करून जवळपास ३२ हजार रूपये दंड वसूल केला होता. यावेळेस मात्र ग्रामपंचायतला कारवाईसाठी वेळ मिळत नसल्याचे चित्र आहे. स्थानिक ग्रामपंचायतचे प्रशासक ग्रामपंचायतीत उपस्थित राहत नसल्याने यावर्षी विनामास्क फिरणाऱ्यांवर कारवाई होत नाही. त्यामुळे येथे सर्रास नियमांचे उल्लंघन सुरू आहे.
नियमांचे उल्लंघन, कारवाईला मिळेना मुहूर्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2021 04:48 IST