शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

रस्ता डांबरीकरणासाठी ढोल ताशांच्या गजरात तहसीलदारांना दिले निवेदन 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2018 18:01 IST

रस्त्याचे डांबरीकरण करण्यात यावे, या मागणीसाठी पळशी झाशी येथील नागरीकांनी ढोल ताशांच्या गजरात तहसीलदारांना निवेदन दिले.

लोकमत न्यूज नेटवर्कसंग्रामपूर :  येथून जवळच असलेल्या पळशी झांशी गावाकडे प्रशासनाचे कायम दुर्लक्ष झाल्याने या गावाला चांगला रस्ता नाही. त्यामुळे या गावाला जोडणाºया रस्त्याचे डांबरीकरण करण्यात यावे, या मागणीसाठी पळशी झाशी येथील नागरीकांनी ढोल ताशांच्या गजरात तहसीलदारांना निवेदन दिले.संग्रामपूर तालुक्यातील पळशी झाशी या गावाला दळण वळणासाठी रस्ता असून नसल्यासारखा आहे. त्यामुळे येथील नागरीकांना मनस्ताप सहन करावा लागतो. या गावातील नागरीकांना अगदी लहान-सहान कामांसाठी संग्रामपूरला यावे लागते.  संग्रामपूर ते पळशी झांशी या पाच किलोमिटर अंतराच्या रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे  पडले आहेत. त्यामुळे या रस्त्यावरून जाताना वाहनधारकांना तारेवरची कसरत करावी लागते. या रस्त्याचे डांबरीकरण करण्यात यावे, यासाठी १६ आॅक्टोबर रोजी पळशी झांशी येथील ग्रामवासियांनी ढोल ताशांच्या गजरात तहसिलदार संग्रामपूर   यांना निवेदन दिले. यावेळी महिला, पुरूष, विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले. पळशी झाशी गावची लोकसंख्या पाच ते साडे पाच हजाराच्या जवळपास आहे. मात्र येथे सुविधांचा अभाव असल्याने नागरीकांना दररोज संग्रामपूर येथे यावे लागते. रूग्णाची प्रकृती बिघडल्यास  रात्री-बेरात्री संग्रामपूर येथे रूग्णालयात दाखल करावे लागते. अशावेळी रस्त्यावरील खड्ड्यांचा मोठा त्रास होतो. दररोज शाळेत येणाºया विद्यार्थ्यांनाही या खडतर रस्त्याने यावे लागत असल्याने त्यांनाही या रस्त्याचा त्रास सहन करावा लागतो. अनेक विद्यार्थी सायकलीने ये-जा करतात. काही विद्यार्थी शाळेत पायी येणे-जाणे करतात. असे असताना, संबंधित प्रशासनाकडून सदर समस्येकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. त्यामुळे गाढ झोपेत असलेल्या प्रशासनाला जागे करण्यासाठी १६ आॅक्टोबर रोजी पळशी येथील ग्रामस्थांनी ढोल ताशांचा गजर करून प्रशासनाला जागी करण्याचा प्रयत्न केला व तहसीलदार यांना निवेदन दिले. (तालुका प्रतिनिधी)

आंदोलनाचा इशारा पळशी झाशी गावाला अद्याप चांगला रस्ता नाही. यामुळे नागरीकांची गैरसोय होत आहे. त्यामुळे २४ आॅक्टोबर पर्यंत संग्रापूर ते पळशी झाशी या रस्त्याच्या डांबरीकरणाला सुरूवात करावी. रस्त्याच्या डांबरीकरणाला सुरूवात न केल्यास २५ आॅक्टोबर रोजी तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा  इशारा यावेळी ग्रामस्थांनी दिला. 

टॅग्स :buldhanaबुलडाणाkhamgaonखामगावSangrampurसंग्रामपूर