शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
5
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
6
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
7
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
8
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
9
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
10
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
11
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
12
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
13
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
14
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
15
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
16
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
17
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
18
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
19
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
20
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

आठ गावांमधील गावकऱ्यांची महावितरणच्या उपकेंद्रावर धडक

By विवेक चांदुरकर | Updated: July 10, 2024 15:56 IST

सिंगल फेज विज पुरवठ्याची मागणी.

विवेक चांदूरकर, खामगाव जि. बुलढाणा, लोकमत न्यूज नेटवर्कमलकापूर: दिवसांतून अनेकदा विज पुरवठा बंद होत असून, तासनतास सुरू होत नाही. त्यामुळे पिकांना पाणी देणे शक्य होत नसल्याने पिकांचे नुकसान होत आहे. तसेच रात्रीच्या वेळी शेतात जावे लागत असल्याने हिंस्त्र प्राण्यांपासून जीवाला धोका असल्याने त्रस्त झालेल्या आठ गावांतील गावकऱ्यांनी महावितरण कंपनीच्या हरसोडा उपकेंद्रावर बुधवारी सकाळी धडक दिली. सिंगल फेज विज पुरवठ्याची मागणी करत एकच गदारोळ केला.

तालुक्यातील महावितरण कंपनीच्या हरसोडा उपकेंद्रा अंतर्गत येणाऱ्या आठ गावांतील गावकरी वारंवार खंडित होणाऱ्या विज पुरवठ्यामुळे त्रस्त झाले आहेत. दिवसांतून २० ते २५ वेळा विजपुरवठा खंडीत होत असल्याने शेतातील पिकांना पाणी द्यायचे कसे? त्याचबरोबर परिसरात वावर असणाऱ्या हिंसक वन्य प्राण्यांपासून संरक्षण करायचे कसे? हा प्रश्न गावकऱ्यांमध्ये खदखदत होता. त्याच धरतीवर मलकापूर तालुक्यातील काळेगांव, हरसोडा, झोडगा, अनुराबाद, धोंगर्डी, वडोदा, पान्हेरा, बहापूरा येथील गावकरी एकवटले. बुधवारी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस संतोष रायपूरे यांच्या नेतृत्वाखाली महावितरण कंपनीच्या हरसोडा उपकेंद्रावर धडक देवून गदारोळ माजवला. यावेळी सहाय्यक अभियंता गोपाल बावस्कर यांच्याशी संतोष रायपूरे व गावकऱ्यांची चर्चा झाली. आठ गावातील गावकऱ्यांनी महावितरण कंपनीला निवेदन सादर केले आहे. त्यात वारंवार खंडित होणाऱ्या विज पुरवठ्यामुळे येणाऱ्या अडचणींचा उहापोह करुन योग्य ती कारवाई न झाल्यास लोकशाही मार्गाने आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.

निवेदनावर, संतोष रायपूरे, काळेगांवचे उपसरपंच मंगेश पटेल, गुणवंत पवार, तेजराव रायपूरे, शंतनु गुलगे, दिगंबर घागरे, अशोक रायपूरे, बाबूराव झाल्टे, गणेश झाल्टे, विठ्ठल मुके, सुंदरलाल पटेल, संजय पटेल, शुभम पटेल, संजय मोरे, बाळू जवरे, राजू जाधव आदींसह असंख्य गावकऱ्यांच्या स्वाक्षरी आहेत.फोटो आहेत.

टॅग्स :buldhanaबुलडाणा