शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

vidhan sabha 2019 : उमेदवारांच्या खर्चावर करडी नजर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2019 14:06 IST

रोख रकम १० लाखांपेक्षा जास्त पकडल्यास त्वरित आयकर विभागाला कळवावे.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : विधानसभा निवडणूकीत प्रशासनाने विविध पथकांची नियुक्ती केली आहे. स्थायी पथक, व्हिडीओ सर्वेक्षण पथक व तपासणी नाका पथकांमधील कर्मचाऱ्यांनी निवडणूक प्रक्रियेत प्रामाणिकपणे काम करावे. उमेदवारांच्या खर्चावर बारकाईने लक्ष ठेवून प्रत्येक खर्चाची नोंद करावी, त्यासाठी नियुक्त पथकांनी समन्वयाने काम करावे, अशा सूचना जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. निरूपमा डांगे यांनी दिल्या आहेत. उमेदवारांच्या खर्चावर निवडणूक विभागाची करडी नजर राहणार आहे.विधानसभा मतदारसंघनिहाय स्थायी, सहायक खर्च निरीक्षक यांची बैठक निवडणूक खर्च निरीक्षक यांच्यासमवेत जिल्हा नियोजन समिती सभागृहात शनिवारी आयोजित करण्यात आली होती. याप्रसंगी मलकापूर, खामगाव व जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघासाठी नियुक्त निवडणूक खर्च निरीक्षक ब्रजेश कुमार, बूलडाणा व चिखली विधानसभा मतदारसंघाचे खर्च निरीक्षक किण्व बाली, आयकर विभागाचे श्रवण कुमार, जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ, उपजिल्हाधिकारी गौरी सावंत आदी उपस्थित होते. पथकांमधील सदस्यांनी काम करताना मिळालेल्या न्यायिक अधिकारांचा उपयोग करण्याच्या सूचना देत खर्च निरीक्षक किण्व बाली म्हणाले, व्हिडीओ पथकाने चेक नाक्यांवर वाहन तपासणी करताना पुर्ण पुरावे व्हिडीओत घ्यावे. जाहीर सभांमध्ये प्रत्येक खर्चाची नोंद घ्यावी. ही नोंद घेण्यासाठी शॅडो रजिस्टर देण्यात आले आहे. शॅडो रजिस्टर व उमेदवारांनी सादर केलेला खर्च याचा ताळमेळ लावावा.कुठल्याही परिस्थितीत उमेदवाराने केलेला खर्च सोडू नये, हे काम करताना न्यायपूर्वक व्यवहार ठेवत दबावाला बळी पडू नये, रॅलीमधील पूर्ण वाहनांचे शूटींग घ्यावे, त्यामध्ये प्रकर्षाने वाहन क्रमांक आले पाहिजेत असेही ते म्हणाले. आयकर विभागाचे श्रवण कुमार म्हणाले, रोख रकम १० लाखांपेक्षा जास्त पकडल्यास त्वरित आयकर विभागाला कळवावे. त्यावर आयकर विभाग पुढील कारवाई करेल. यानंतर खर्च सनियंत्रण कक्षाचे नोडल जाधव यांनी उपस्थितांना खर्च नोंदीबाबत प्रशिक्षण दिले. याप्रसंगी विधासनभा मतदारसंघातील नियुक्त कर्मचारी, जिल्हास्तरीय समित्यांचे प्रमुख उपस्थित होते.(प्रतिनिधी)

टॅग्स :buldhanaबुलडाणाMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019