शहरं
Join us  
Trending Stories
1
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
3
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
4
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
5
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
6
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
7
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
8
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
9
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
10
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
11
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
12
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
13
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
14
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
15
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
16
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
17
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
18
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
19
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
20
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
Daily Top 2Weekly Top 5

vidhan sabha 2019 : चिखली बनले पक्षांतराचे केंद्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2019 14:54 IST

मतदारसंघ सध्या पक्षांतराच्या बाबतीच केद्रंस्थानी आला असून आता राहूल बोंद्रेंची प्रतीक्षा असल्याची चर्चा आहे.

- नीलेश जोशी लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: विधानसभा निडणुकीसाठी नामांकन अर्ज दाखल करण्यास प्रारंभ होत असतानाच जिल्ह्यात नव्या समिकरणांची नांदी सुरू झाली असून स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने नव्या चर्चांना उधाण आले आहे. ज्या चिखली विधानसभा मतदारसंघावरून इतिहासात मोठे रणकंदन झाले होते. तोच मतदारसंघ सध्या पक्षांतराच्या बाबतीच केद्रंस्थानी आला असून आता राहूल बोंद्रेंची प्रतीक्षा असल्याची चर्चा आहे.स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे सदाभाऊ खोत यांनी संघटनेशी काडीमोड घेतल्यामुळे रविकांत तुपकर हे स्वाभामीनी शेतकरी संघटनेत दुसऱ्या क्रमांकाचे नेते बनले होते. त्यामुळे त्यांना प्रदेशाध्यक्षपद बहाल करण्यात आले होते. लोकसभा निवडणुकीत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारासाठी प्रचारात मोठी भूमिका निभावली होती. त्यावेळी त्यांची भाषणे चांगलीच गाजली होती.दरम्यान, तुपकर यांनी २५ सप्टेंबर रोजी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन जवळपा एकसात चर्चा केली होती. त्या पृष्ठभूमीवर २६ सप्टेंबर रोजी त्यांनी स्वाभीमानीच्या आपल्या प्रदेशाध्यक्षपदाचा अवघ्या साडेचार ओळीत राजीनामा दिला.दरम्यान, आता त्यांची पुढची भूमिका नेमकी काय राहणार आहे, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र भाजपच्या वाटेवर ते असल्याचे स्पष्ट झाले आहे. स्वाभीमानी शेतकरी संघटनेला हा मोठा धक्का मानल्या जात आहे.दुसरीकडे गेल्या विधानसभा निवडणुकीदरम्यान चिखलीचे विद्यमान आ. राहूल बोंद्रे विरोधात रविकांत तुपकर यांनी मोठी आघाडी उघडली होती. सध्या काँग्रसचे हे आ. राहूल बोंद्रे हे भाजपच्या वाटेवर असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यावरून मोठ्या प्रमाणावर अफवांना पेव फुटले आहेत. दिल्ली, मुंबईच्या वाºयाही राहूल बोंद्रेंनी केल्या आहेत. सोबतच आपण काँग्रेसचेच आहोत आणि राहणार असे वक्तव्यही त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना केले आहे. त्यामुळे त्यांच्या ‘तळ््यात-मळ््यातील’ भूमिकेमुळे भाजपसह काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. अशा स्थितीत बोंद्रेंचा नेमका निर्णय काय याचीच आता प्रतीक्षा उरली आहे. येत्या दोन दिवसात जिल्ह्यात राजकीयदृष्ट्या आणखी काही मोठ्या घडामोडी होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणाchikhli-acचिखलीPoliticsराजकारणRahul Bondreराहुल बोंद्रेRavikant Tupkarरविकांत तुपकर