शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

रविवारी विदर्भस्तरीय तुकडोजी महाराज साहित्य संमेलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2017 00:41 IST

बुलडाणा: पाचवे विदर्भस्तरीय वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज साहित्य संमेलन  २६ नोव्हेंबर रोजी बुलडाण्यात आयोजित करण्यात आले असून, संत गाडगेबाबा  अमरावती विद्यापीठाचे प्र. कुलगुरू डॉ. राजेश जयपूरकर यांच्या हस्ते या  संमेलनाचे उद्घाटन होणार आहे.

ठळक मुद्देविविध परिसंवद भारतीय विचार मंचातर्फे आयोजन

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: पाचवे विदर्भस्तरीय वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज साहित्य संमेलन  २६ नोव्हेंबर रोजी बुलडाण्यात आयोजित करण्यात आले असून, संत गाडगेबाबा  अमरावती विद्यापीठाचे प्र. कुलगुरू डॉ. राजेश जयपूरकर यांच्या हस्ते या  संमेलनाचे उद्घाटन होणार आहे.संमेलनाध्यक्ष म्हणून वारी भैरवगड येथील ज्ञानेश आश्रमाचे हरिभक्त परायण  ज्ञानेश्‍वर महाराज वाघ उपस्थित राहणार आहे. बुलडाणा येथील पंकज लद्धड  इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजी अँन्ड मॅनेजमेंट स्टडीज आणि भारतीय विचार मंच  विदर्भ यांच्या वतीने हे संमेलन आयोजित करण्यात आले असल्याची माहिती १९  नोव्हेंबर रोजी स्थानिक पत्रकार भवनामध्ये आयोजित पत्रकार परिषदेमध्ये  भारतीय  विचार मंचचे संयोजक सुभाष लोहे यांनी दिली. यावेळी संमेलनाचे संयोजक रवींद्र  लद्धड, प्राचार्य प्रदीप जावंधिया, सह संयोजक प्रवीण चिंचोळर, प्रसिद्धी प्रमुख बाळ  अयाचित प्रामुख्याने उपस्थित होते. नेरी (चंद्रपूर), भंडारा, लाखांदूर, यवतमाळनं तर आता बुलडाण्यात हे संमेलन होत आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या  साहित्यावर आधारित विदर्भस्तरीय साहित्य संमेलनाचे आयोजन चार वर्षांपासून  आयोजित केले जात आहे. राष्ट्रसंतांच्या साहित्यावर अधिक चिंतन व्हावे, ग्रामगी तेमध्ये सामान्य माणसाच्या कर्तव्यशीलतेबाबत अनेक बाबींचा ऊहापोह केला  आहे. अध्यात्मातून राष्ट्रभक्ती हा दृष्टिकोन समोर ठेवून हे संमेलन आयोजित  करण्यात येत असल्याचे सुभाष लोहे म्हणाले. संमेलनाचे स्वागताध्यक्ष म्हणून  खामगाव अर्बन बँकेचे अध्यक्ष आशीष चौबिसा, गुरुकुंज आश्रमाचे अ.भा.  सरचिटणीस जनार्दनपंत बोथे, नांदुरा आश्रमाचे आचार्य हरिभाऊदादा वेरुळकर  गुरुजी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. अमरावतीचे प्रख्यात वक्ते  प्राचार्य अरविंद देशमुख यांचे समारोपीय भाषण होईल.साहित्य संमेलनात अध्यात्मबोध व राष्ट्रबोध या दोन विषयावरील परिसंवादाचे  आयोजन करण्यात आले असून, अध्यक्ष म्हणून अनुक्रमे प्राचार्य शांताराम बुटे,  अकोला, डॉ. राजेंद्र नाईकवाडे, नागपूर हे उपस्थित राहणार आहेत. उपविषयांवर  डॉ. विकास बाहेकर, प्रा. मारेश्‍वर देशमुख, आष्टी, अरुण नेटके, प्रा. राजीव  बोरकर यांच्यासह अन्य उपस्थित राहतील. या एकदिवसीय संमेलनात सकाळी  आठ वाजता ग्रंथदिंडी निघेल, साडेदहा वाजता संमेलनाचे उद्घाटन होईल.  सायंकाळी चार ते पाच या कालावधीत समारोप सत्र होईल. या संमेलनास बुलडाणा, अकोला, वाशिम जिल्हय़ातील विद्वतजन, शिक्षण संस्थांचे  संचालक, प्राध्यापक, अध्यापक, सामाजिक, राजकीय, धार्मिक क्षेत्रातील नेतृत्व  कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन स्वागताध्यक्ष आशीष चौबिसा,  इन्स्टिट्युटचे अध्यक्ष डॉ. दीपक लद्धड, संमेलनाचे संयोजक रवींद्र लद्धड व सह  संयोजक प्रवीण चिंचोळकर यांनी केले आहे.     

टॅग्स :Rashtrasant Tukadoji Maharajराष्ट्रसंत तुकडोजी महाराज