शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO : जून 2017 पर्यंत अपूर्ण विहिरींचे कामे होणार पूर्ण

By admin | Updated: November 10, 2016 14:29 IST

ऑनलाइन लोकमत हर्षनंदन वाघ/ बुलडाणा, दि 10 -  शेतक-यांना शाश्वत सिंचनाची सुविधा निर्माण होऊन दुबार पीक घेणे सुलभ व्हावे ...

ऑनलाइन लोकमत

हर्षनंदन वाघ/ बुलडाणा, दि 10 -  शेतक-यांना शाश्वत सिंचनाची सुविधा निर्माण होऊन दुबार पीक घेणे सुलभ व्हावे तसेच उत्पादकताही वाढावी यासाठी पंतप्रधान पॅकेज अंतर्गंत सिंचन विहिर योजन सुरू केली होती. मात्र मंजूर विहिरींपैकी अनेक विहिरींचे कामे अपूर्ण असल्यामुळे त्या रद्द करण्यात आल्या होत्या. मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विशेष बाब म्हणून अपूर्ण असलेल्या विहिरी पूर्ण करण्याचे आदेश दिले. याचा 840 लाभार्थ्यांना फायदा होणार आहे. 
 
पंतप्रधान पॅकेजअंतर्गंत विदर्भातील काही जिल्ह्यांसाठी सिंचन विहीर योजना सुरू करण्यात आली होती. त्यानुसार बुलडाणा जिल्ह्याला 16 हजार 900 सिंचन विहिरींचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. त्यापैकी 13 हजार 547 विहिरी मंजूर करण्यात आल्या होत्या. मात्र काही विहिरींचे काम सुरू न झाल्यामुळे तर काही ठिकाणी कामे अपूर्ण असल्यामुळे 4 हजार 526 विहिरी रद्द करण्यात आल्या होत्या.
 
दरम्यान सिंचन विहिरींसाठी खर्च 1 लाखावर 2 लाख 50 हजार रूपये देण्याचे शासनाने ठरवले. याबाबत जिल्हाधिकारी व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी शासनाकडे अपूर्ण विहिरींचे कामे पूर्ण करण्यासाठी पाठपुरावा केला. त्यास मुख्यमंत्र्यांनी परवानगी दिल्यानंतर जून 2016 पर्यंत अपूर्ण असलेल्या 1 हजार 946 विहिरींचे काम पूर्ण करण्याची परवानगी मिळाली. त्यानुसार 1 हजार 106 विहिरींचे काम पूर्ण करण्यात आले. तर उर्वरित 840  सिंचन विहिरींचे काम पूर्ण करण्यासाठी जून 2017 पर्यंत परवानगी देण्यात आली आहे.  
 
अपूर्ण विहिरींचे काम पूर्ण करण्याचे आवाहन
बुलडाणा जिल्ह्यात जून 2017 पर्यंत 840 अपूर्ण विहिरींचे काम पूर्ण करण्यात येणार आहे.  याबाबत लवकरच जिल्हाधिकारी डॉ.विजय झाडे व जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी दिपा मुधोळ यांच्या मार्गदर्शनाखाली बैठक घेण्यात येणार असून विहिरींचे उद्दिष्ट पूर्ण करण्याच्या दृष्टीने नियोजन करण्यात येणार आहे. अर अपूर्ण विहिरी असलेल्या शेतक-यांना विहिरींचे काम पूर्ण करण्याचे आवाहन केले आहे.
 
जिल्ह्यातील अपूर्ण विहिरींची संख्या
बुलडाणा - 50
चिखली - 81
देऊळगाव राजा - 25
जळगाव जामोद - 37
खामगाव - 10
लोणार - 104
मलकापूर - 112
मेहकर - 36
मोताळा - 140
नांदूरा - 150
संग्रामपूर - 14
शेगाव - 25
सिंदखेड राजा - 56
 
 

https://www.dailymotion.com/video/x844hgr