शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

विदर्भ आंदोलन समितीचा ‘विदर्भ मिशन अ‍ॅक्शन प्लॅन’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2019 14:38 IST

नववर्षात जेलभरो, आत्मक्लेष, रास्ता रोको यासह १ मे २०२० रोजी विदर्भ बंद आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती माजी आमदार अ‍ॅड. वामनराव चटप यांनी दिली.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : नववर्ष २०२३ पर्यंत स्वतंत्र विदर्भ राज्य घेण्यासाठी विदर्भ राज्य आंदोलन समितीने ‘विदर्भ मिशन २०२३’ हा अ‍ॅक्शन प्लॅन तयार केला आहे. त्याकरिता विदर्भ राज्य आंदोलन समिती आंदोलन पावित्र्यात आहे. शासनाने लक्ष वेधण्यासाठी नववर्षात जेलभरो, आत्मक्लेष, रास्ता रोको यासह १ मे २०२० रोजी विदर्भ बंद आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती माजी आमदार अ‍ॅड. वामनराव चटप यांनी दिली.विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या वतीने स्वतंत्र विदर्भ राज्य निर्माण कार्यकर्ता बैठकीसाठी सोमवारी बुलडाणा येथे आले असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी रंजना मामर्डे, अ‍ॅड. सुरेश वानखेडे, तेजराव मुंडे, गणेश तायडे, कैलाश फाटे, डॉ. बाबुराव नरोटे, देविदास कणखर, समाधान कणखर, नामदेवराव जाधव, दामोदर शर्मा, डॉ. विनायक वाघ, हरिदास खांदेभराड उपस्थित होते. चटप म्हणाले, २०१४ च्या निवडणूकीत भाजपाने विदर्भातील जनतेला विदर्भाच्या नावाने मते मागितली. त्यांच्यावर विश्वास ठेवून जनेतेने मते दिली. परंतू शिवसेनेच्या विरोधामुळे भाजपाने विदर्भातील जनतेचा विश्वासघात केला.भाजपाने विदर्भाशी बेईमानी केली म्हणून महाराष्ट्रातून सत्ता गेली. स्वतंत्र राज्य निर्मिती करण्याचा अधिकार केंद्र सरकारचा असतो. आता शिवसेना व भाजप वेगवेगळे झाल्याने भाजपच्या केंद्र शासनाला वेगळा विदर्भ द्यावाच लागेल. जनतेने वेगळ्या विदर्भाच्या लढाईत सामिल व्हावे, असे आवाहन त्यांनी केले.वेगळे विदर्भ राज्य द्या, विदर्भातील जनतेचे विजबिल निम्मे करा, विदर्भाला औष्णीक विज केंद्राच्या प्रदुषणाने मुक्त करा, शेतकऱ्यांना कर्ज मुक्त व विज बिल मुक्त करा, शेतकऱ्यांना एकरी ३० हजार व फळबागेला ५० हजार रुपये नुकसान भरपाई द्या आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या. असा आहे 'विदर्भ मिशन अ‍ॅक्शन प्लॅन'स्वतंत्र विदर्भ राज्यासह इतर मागण्या मान्य करुन घेण्यासाठी विदर्भ राज्य आंदोलन समितीने विदर्भ मिशन २०२३ अ‍ॅक्शन प्लॅन तयार केला आहे. त्यानुसार २४ डिसेंबर रोजी प्रत्येक जिल्हा व तालुका स्तरावर १ दिवसीय आत्मक्लेष आंदोलन, महावितरण अभियंता कार्यालयासमोर १५ ते २४ जानेवारी दरम्यान धरणे व निदर्शने, १० फेब्रुवारी रोजी सर्व जिल्हा व तालुका स्तरावर रास्ता रोको, जेलभरो आंदोलन, २५ फेब्रुवारी रोजी नागपूर येथे रेले रोको आंदोलन व १ मे २०२० रोजी संपूर्ण विदर्भ बंद आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनात जनतेने सहभागी व्हावे, असे आवाहन विदर्भ आंदोलनचे नेते माजी आ. अ‍ॅड. वामनराव चटप यांनी केले.

टॅग्स :buldhanaबुलडाणाWamanrao Chatapवामनराव चटप