खामगाव: पाणी आणण्यासाठी शेताकडे जात असताना इसमाला कंटेनरने धडक दिली. यामध्ये सायकलस्वार ठार झाला. ही घटना ८ एप्रिल रोजी तालुक्यातील लांजूड येथे घडली. लांजूड येथील सुधाकर भगवान थेरोकार (वय ४२) हे पाणी आणण्यासाठी शेतात सायकलने जात होते. दरम्यान, समोरून येणार्या जिगाव प्रकल्पाचे लोखंडी पाइप घेऊन जाणार्या कंटेनर क्रमांक एम.एच.0४ डीडी ८0४९ च्या चालकाने सायकलस्वार सुधाकर थेरोकार यांना धडक दिली. या धडकेत सुधाकर थेरोकार हे गंभीर जखमी झाले. त्यामुळे त्यांना उपचारासाठी खामगाव येथील सामान्य रुग्णालयात आणण्यात आले; मात्र उपचाराआधीच त्यांचा मृत्यू झाला. गुढीपाडव्याच्या दिवशी घडलेल्या या घटनेमुळे लांजूड येथे शोककळा पसरली आहे.
पाण्याने घेतला बळी!
By admin | Updated: April 9, 2016 01:33 IST