शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
4
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
5
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
6
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
7
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
8
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
9
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
10
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
11
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
12
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
13
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
14
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
15
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
16
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
17
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
18
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
19
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
20
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
Daily Top 2Weekly Top 5

रस्त्यात फसतात वाहने, शेतातून माल घरापर्यंत न्यायचा कसा?

By ब्रह्मानंद जाधव | Updated: October 27, 2023 16:10 IST

किनगाव जट्टू परिसरात एकही शेतरस्ता व्यवस्थित नसल्याने शेतकऱ्यांना बाराही महिने अडचणींचा सामना करावा लागत आहे.

किनगाव जट्टू : हंगामाच्या वेळी शेतात तयार झालेला शेतमाल शेतातून घरी आणण्याकरिता शेतकऱ्यांना तारेवारची कसरत करावी लागत आहे. पाणंद रस्त्याची दुरवस्था झालेली असल्याने जीवघेण्या शेत रस्त्यात शेतकरी अडकल्याचे चित्र किनगाव जट्टू परिसरात दिसत आहे. पाणंद रस्त्यात ट्रॅक्टर फसत असल्याने शेतातून माल घरापर्यंत न्यायचा कसा? असा प्रश्न शेतकऱ्यांमधून उपस्थित होत आहे.

किनगाव जट्टू परिसरात एकही शेतरस्ता व्यवस्थित नसल्याने शेतकऱ्यांना बाराही महिने अडचणींचा सामना करावा लागत आहे. ग्रामीण भागातील शेतरस्ते शेतकऱ्याचे शेतीचे उत्पादन वाढीकरिता अत्यंत महत्त्वाचे असल्याने शासनाच्यावतीने पालकमंत्री पाणंद रस्ते, मातोश्री पांदण रस्ते अशा विविध नावाने योजना काढण्यात आल्या आहेत. परंतु परिसरातील रस्त्यांचे कुठलीच कामे झाले नसून केवळ कागदोपत्रीच ही कामे पडून राहिल्याने बाराही महिने शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. पूर्वी भरपूर प्रमाणात शेती पडीत राहत असल्याने शेती मशागतीचे अवजारे शेतकऱ्यांना कोठूनही नेता येत होते. परंतु कुटुंबातील लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने संपूर्ण मालकीचे जमिनीचे क्षेत्र वहिती करण्यात आल्याने ते पूर्वीचे रस्ते बंद झाले आहेत. पूर्वीच्या वहिवाटीचे पांणद रस्त्याच्या दोन्ही बाजूने शेतकऱ्यांनीच अतिक्रमण केल्यामुळे रस्ते अरूंद झाले आहेत.

शेतमाल अडकला रस्त्यातकिनगावजट्टू येथील शेतकरी खोटे यांच्या शेतातून सोयाबीनचा माल घरी आणण्यासाठी मालवाहू वाहन नेण्यात आले. दरम्यान, वसंतनगर शिवारातून सोयाबीनचा शेतमाल मालवाहू वाहनाने शेतातून घरी आणत असताना पाणंद रस्त्यात ते वाहन फसले. दरम्यान, दुसरे ट्रॅक्टर आणून ते वाहन काढण्यासाठी शेतकऱ्यांना मोठी धडपड करावी लागली.

रस्त्याला बघून ना ट्रॅक्टर येत, ना शेतमजूरकृषी क्षेत्रामध्ये यांत्रिकीकरण झाले असल्याने पेरणीपूर्व मशागतीसह नागरणी वखरणी पेरणी कीटकनाशक फवारणी शेतीची इतर कामे ट्रॅक्टरद्वारे केली जातात. परंतु अरुंद शेत रस्ते, त्यातही पावसाळ्यात गटारे होत असल्याने दुरवस्था झाली आहे. त्यामुळे ट्रॅक्टर शेतात मशागती करिता नेण्यासाठी ट्रॅक्टर मालक तयार होत नाहीत. शेतमजूरही रस्त्याच्या त्रासामुळे शेतात येत नाहीत.