शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

विश्वगंगा नदीपात्रात आढळली पुरातन मूर्ती!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2018 22:06 IST

विश्वगंगा नदीपात्रात वडनेर शिवारात सुरू असलेल्या महामार्ग विस्तारीकरणाच्या खोदकामात अखंड पाषाणात कोरलेली साडेतीन ते चार फुट उंच पुरातन मुर्ती सापडली

संदीप गावंडे नांदुरा :   विश्वगंगा नदीपात्रात वडनेर शिवारात सुरू असलेल्या महामार्ग विस्तारीकरणाच्या खोदकामात अखंड पाषाणात कोरलेली साडेतीन ते चार फुट उंच पुरातन मुर्ती सापडली. मूर्ती सापडल्याची वार्ता समजताच, परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी  मुर्ती पाहण्यासाठी गर्दी केली. मलकापूर ते नांदुरा दरम्यान महामार्ग विस्तारीकरणासाठी माती, मुरूम उपलब्ध होण्यासाठी वडनेर येथील विश्वगंगा नदीपात्रात खोदकाम सुरू  आहे. दरम्यान मंगळवारी महामार्गावरील विश्वगंगा नदीवरील पुलापासून उत्तरेकडे एक ते दीड किलोमीटर अंतरावर वियोगी आश्रमाजवळ पोकलॅड मशीनच्या सहाय्याने खोदकाम सुरू असताना पृष्ठभागापासून जवळपास १५ फुट खाली मोठ्या दगडासारखे काही असल्याचे मशीन मालकाच्या निदर्शनास आले  . पूर्ण खोदले असता एका अखंड पाषाणात कोरलेली पुरातन मुर्ती निघाली. यावेळी काहीगावकºयांच्या मदतीत मुर्ती मोकळ्या जागेवर ठेवण्यात आली. सुरूवातीस मुर्ती भगवान गौतम बुध्दांची आहे की भगवान महावीरांची आहे यावर प्रत्यक्षदर्शींनी चर्चा केली. एव्हाना, संपुर्ण वडनेर गावात ही बाब वाºयासारखी पसरली व मुर्तीला पाहण्यासाठी नदीपात्रात गर्दी उसळली. सदर मुर्ती योग्य मानसन्मानात सकाळी सुरक्षीतस्थळी हलविणार असल्याचे माजी जि.प. सदस्य नितीन देशमुख यांनी सांगितले. कोट...सदर मुर्तीच्या मागे नागाची फण आहे तसेच मांडीवर हात ठेवलेली ध्यानस्थ मुद्रा आहे. यावरून सदर मुर्ती जैन धर्माचे तेवीसावे धर्मगुरू भगवान पार्श्वनाथांची असावी, असे माझे मत आहे.- शांतीलाल नाहर,अध्यक्ष भारतीय जैन संघटना नांदुरा

सदर मुर्तीच्या एकंदरीत रचनेवरून मुर्ती भगवान बुध्दांची असण्याची शक्यता कमी आहे. सदर मुर्ती जैन धर्मगुरूंचीच असावी.- अशांतभाई वानखेडे,अध्यक्ष समतेचे निळे वादळ संघटना