शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

वंदेमातरम् मंडळाने साकारला सजिर्कल स्ट्राइकचा देखावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2017 00:25 IST

खामगाव येथील गांधी चौकातील वंदेमातरम् नवयुवक  मंडळाच्यावतीने यावर्षी गणेशोत्सवात सजिर्कल स्ट्राइकचा देखावा  सादर करण्यात आला आहे. हा देखावा गणेशोत्सवाचे विशेष  आकर्षण ठरत आहे.

ठळक मुद्देयंदाच्या गणेशोत्सवाचे विशेष आकर्षणदहशतवाद्यांच्या छावण्यांना लक्ष्य करतानाचे दृश्य 

लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव : येथील गांधी चौकातील वंदेमातरम् नवयुवक  मंडळाच्यावतीने यावर्षी गणेशोत्सवात सजिर्कल स्ट्राइकचा देखावा  सादर करण्यात आला आहे. हा देखावा गणेशोत्सवाचे विशेष  आकर्षण ठरत आहे.वंदेमातरम् मंडळाच्यावतीने दरवर्षी गणेशोत्सवादरम्यान आकर्षक  देखावा सादर करण्यात येतो. यामध्ये धार्मिक, सामाजिक व  पौराणिक स्वरूपाचे देखावे सादर केले जातात. यावर्षी मंडळाचे  गणेशोत्सवाचे ३४ वे वर्ष असून, यंदा पाकव्याप्त काश्मीरमधील  सजिर्कल स्ट्राइकचा रोमहर्षक देखावा सादर केला आहे. रॉयल  डेकोरेटर्स, अमरावतीद्वारा प्रस्तुत या देखाव्याचे निवेदक किरण  जोशी, अमरावती हे असून, पार्श्‍वभूमीसह संपूर्ण घटनाक्रमाचे  निवेदन यामध्ये सादर केलेले आहे. पाकिस्तानकडून भारतात  पसरविला जात असलेला दहशतवाद, पठाणकोट व उरी येथील  दहशतवादी हल्ले यांच्या पार्श्‍वभूमीवर भारतीय सैन्यदलाने २९ स प्टेंबर २0१६ रोजी पाकव्याप्त काश्मिरात घुसून पाकिस्तानी दहश तवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त केले. तसेच ३५ ते ४0 दहशतवाद्यांचा  मुडदा पाडला. या घटनेचे रोमहर्षक वर्णन निवेदकाने केलेले  असून, सदर देखावा गणेशभक्तांच्या पसंतीस उतरत आहे. एलईडी  स्क्रीनवर पार्श्‍वभूमी स्पष्ट करणारी उत्कृष्ट दृश्ये दाखविण्यात येत  असून, देखाव्यामध्ये हेलिकॉप्टरमधून उतरणारे कमांडो व  त्यांच्याकडून दहशतवाद्यांच्या छावण्यांना लक्ष्य करतानाचे दृश्य  अंगावर रोमांच उभे करणारे ठरत आहे. त्यामुळे हा देखावा  पाहण्यासाठी भाविकांची गर्दी होत आहे.