शहरं
Join us  
Trending Stories
1
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
2
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
3
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
4
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
5
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
6
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
7
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
8
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
9
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
10
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
11
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
12
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
13
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
14
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
15
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
16
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
17
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
18
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
19
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
20
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!

वान धरण आर्थिक उत्पन्नाचे स्रोत !

By admin | Updated: December 22, 2014 00:46 IST

राजकीय, शासकीय इच्छाशक्तीची गरज : पर्यटन, शेती, व्यवसायाच्या विविध संधी.

पंजाबराव ठाकरे /संग्रामपूरनैसर्गिकदृष्ट्या तालुक्यासाठी वरदान असलेल्या वान धरणाचा नियोजनात्मक वापर होत नसल्याने कोट्यवधी रुपयांचा खर्च होऊनही या भागातील शेतकर्‍यांना उपेक्षितच राहावे लागत आहे. आर्थिक उत् पन्नाचे स्रोत निर्माण करण्यासाठीही हे धरण लाभदायी ठरणारे आहे. फक्त राजकीय व शासकीय इच्छाशक्तीचा वापर होणे गरजेचे ठरत आहे.बुलडाणा व अकोला जिल्हय़ाच्या सीमेवर असलेल्या वान धरणाच्या पाण्याचा संग्रामपूरसारख्या मागास तालुक्याला आतापर्यंत पाहिजे तसा लाभ झाला नाही. खारपाणपट्टा असल्याने पिण्यासाठी गोडे पाणी या धरणातून देण्यासाठी आता कुठे योजना कार्यान्वित होण्याच्या प्रतीक्षेत आहे. धरणाला लागून प्राचीन म्हणजे सर्मथ रामदास स्वामींच्या हस्ते हनुमान मूर्तीची स्थापना येथे करण्यात आली असून, वारीचा हनुमान म्हणून राज्यभर या ठिकाणाची ओळख आहे व भक्तही आहेत. मात्र राजकीय व शासकीय स् तरावर याबाबत उदासीनता असल्याचे दिसून येत आहे. आतापर्यंत भौगोलिक स्थिती असतानाही काहीही झाले नाही. एमटीडीसीचे निवासस्थानसुद्धा येथे आतापर्यंत निर्माण करण्यात आले नाही. किमान आता तरी यामध्ये धडाडीने कार्य होण्याची अपेक्षा आहे. याच धरणामुळे संग्रामपूर तालुक्यातील वान नदीच्या तेल्हाराकडील काठावरील गावांमध्ये पाटाच्या पाण्यामुळे रब्बी पिके घेण्याची संधी आहे. यासाठी वानखेड-उकळी कालवा पातुर्डा गावापर्यंत आहे. यामध्ये पाणीवापर संस्था निर्माण करण्यात आल्या; परंतु सिंचनाचे लाभक्षेत्र या संस्थाकडे तांत्रिकत्रृट्या राहिल्याने आजपर्यंत हस्तांतरित करण्यात आले नाही म्हणून यंदा दुष्काळी परिस्थितीत धरणात पाणी असतानाही शेतकर्‍यांना एक पाणी पिकासाठी मिळाले नाही. एका पाण्याने या भागातील शेतकर्‍यांना दिलासा मिळाला असता; परंतु वान पाटबंधारे विभागाचे अधिकारी याकडे लक्ष देताना दिसत नाहीत. सद्य:स्थितीत पाटसरीच नसल्याने दररोज लाखो लीटर पाणी वाया जात आहे. लाभ क्षेत्रातील शेतापर्यंत पाणी देण्यासाठी पाटसरी व्यवस्थित करण्याची जाबबदारी ज्या विभागाची असते त्या विभागाकडून यासाठी लाखो रुपये खर्ची घालूनही वितरण व्यवस्था शिल्लक राहिली नाही. ज्या शेतात पाटसरीने पाणी जात नाही त्या लाभधारक शेतकर्‍यांसाठी पाणी देण्याच्या हिशेबाने पाटात कूपनलिका कार्यान्वित करण्यासाठी लाखो रुपये खर्च करण्यात आला; मात्र कू पनलिकेवर वीज व मशीनचाही पत्ता नसल्याने कार्यान्वित नाहीत.