शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
3
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
4
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
5
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
6
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
7
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
8
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
9
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
10
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
11
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
12
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
13
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
14
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
15
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
16
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
17
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
18
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
19
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
20
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
Daily Top 2Weekly Top 5

पहिल्या वर्षी टीईटी उत्तीर्ण झालेल्यांची वैधता संपली!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2020 11:30 IST

.पहिली टीईटी ही २०१३ मध्ये घेण्यात आली होती.

- ब्रम्हानंद जाधव  लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : डीएड् व बीएड् झालेल्या बेरोजगारांची संख्या राज्यात लाखोंच्या घरात आहे. या भावी शिक्षकांची पात्रता तपासण्यासाठी गेल्या सात वर्षामध्ये सहावेळा टीईटी घेण्यात आली आहे. पहिल्या वर्षी टीईटी दिलेल्यांची आता मुदत संपूष्टात आलेली आहे. आतापर्यंत टीईटी निकालाचा टक्का वाढला नसून, केवळ पाच ते दहा टक्केच निकाल लागत आहे.शिक्षक पात्रता परीक्षा दरवर्षी आवश्यकतेनुसार किमान एकदा घेण्याचे शिक्षण विभागाचे निर्देश आहेत. टीईटी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना शिक्षक पात्रता परीक्षा प्रमाणपत्र देण्यात येते. या प्रमाणपत्राची वैधताही सात वर्षांची असते. गुणवत्ता पातळीत वाढ करण्यासाठी या परीक्षेस कितीही वेळा प्रविष्ट होता येते. मात्र टीईटी उतीर्ण झाल्यानंतर त्या उमेदवाराची पात्रता ही सात वर्षांसाठीच असते.पहिली टीईटी ही २०१३ मध्ये घेण्यात आली होती. त्यामुळे पहिल्या वर्षी टीईटीमध्ये उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांच्या टीईटी प्रमाणपत्राची मुदत आता संपली आहे. टीईटीमध्ये प्राथमिक व माध्यमिक असे दोन स्तर करण्यात आले आहेत.

टीईटी धारक संभ्रमातज्या उमेदवारांनी टीईटी दिली नाही किंवा अनुत्तीर्ण झाले ते शिक्षक पदावर नियुक्तीसाठी पात्र समजले जात नाहीत. त्यामुळे २०१३ मध्ये ही पात्रता परीक्षा उत्तीर्ण झालेल्या उमेवारांना नियमाप्रमाणे आता पुन्हा टीईटी उत्तीर्ण व्हावे लागणार का, याबाबत अद्याप कुठल्याच सुचना आलेल्या नाहीत. त्यामुळे टीईटीधारकही सध्या संभ्रमात आहेत. कोरोना विषाणु संसर्गामुळे सध्या टीईटी होण्याची शाश्वती कमीच आहे.

दोन्ही वर्षाचा निकाल कमीच!राज्यात सात लाखावर डीएड्, बीएड्धारक बेरोजगार आहेत. मागील वर्षी सहा लाखांवर उमेदवार परीक्षेला बसले होते. त्यापैकी जवळपास १ लाख ६५ हजार विद्यार्थी उत्तीर्ण झाल्याची माहिती आहे. जानेवारी २०२० मध्ये घेण्यात आलेल्या शिक्षक पात्रता परीक्षेत ३ लाख ५३ हजार पैकी १६ हजार ५९२ शिक्षक उर्त्तीण झाले आहेत.

टॅग्स :Teachers Recruitmentशिक्षकभरतीbuldhanaबुलडाणाEducation Sectorशिक्षण क्षेत्र