मोताळा : येथील पंचायत समिती कार्यालयासमोर रमाई घरकुल योजनेपासून वंचित लाभार्थ्यांंचा पात्र यादीत समावेश करावा व खर्या पात्र लाभार्थ्यांच्या घरांची प्रत्यक्ष पाहणी करून अपात्र लाभार्थ्यांंची नावे वगळावी, या मागणीसाठी शिरवा येथील मागासवर्गीय वंचित लाभार्थ्यांंनी १४ ऑगस्टपासून उपोषण सुरू केले आहे.गटविकास अधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, शिरवा येथील मागासवर्गीय कुटुंबांचा दारिद्रय रेषेखालील यादीत समावेश असून, रमाई घरकूल योजना अतंर्गत पात्र लाभार्थ्यांंवर ग्रामपंचायतकडून लाभार्थी निवडीत पक्षपात झाला आहे. ग्रा.पं.कडून जुलै २0१२ च्या सभेत २८ लाभार्थ्यांंची निवड करण्यात आली होती. या यादीत पात्र लाभार्थ्यांंना वंचित ठेवल्यामुळे पुन्हा २६ जानेवारी २0१३ रोजीच्या सभेत ५३ लाभार्थ्यांंची यादी बनविण्यात आली. मात्र या यादीतही पात्र लाभार्थ्यांंवर अन्याय झाल्यामुळे दोन डिसेंबर २0१३ रोजी पुन्हा १७ लाभार्थ्यांंची पुरवणी यादी पंचायत समितीमध्ये सादर करण्यात आली. ग्रामपंचायतीकडून यादीचा घोळ सुरू असल्यामुळे पात्र लाभार्थी या योजनेपासून वंचित राहात असल्याचा आरोपही निवेदनात करण्यात आला आहे. यासाठी प्रशासनाने शिरवा येथील पात्र लाभार्थ्यांंच्या घराची प्रत्यक्ष पाहणी करून,खर्या पात्र लाभार्थ्यांंची यादी तयार करावी व मंजुरात देऊन अपात्र लाभार्थ्यांंंची नावे वगळाण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली होती. मात्र तरीही संबधीतांनी दुर्लक्ष केले. परिणामी दिलेल्या इशाराप्रमाणो रमेश जगदेवराव वाघ, वसंत नामदेव धुरंधर, गौतम जगदेव वाघ, विनोद जगन्नाथ उमाळे, भगवान संपत धुरंधर आदिंनी बेमुदत उपोषण सुरू केले आहे.
घरकुलपासून वंचितांचे उपोषण सुरू
By admin | Updated: August 20, 2014 22:33 IST