शहरं
Join us  
Trending Stories
1
वीज कमी वापरणाऱ्यांना स्वस्त दर; जास्त वापरल्यास बिलात ‘झटका’, किती युनिटपर्यंत दिलासा?
2
आजचे राशीभविष्य - २६ जून २०२५, या राशीच्या मंडळींना सरकारकडून लाभ होईल, धन, मान-सन्मान वाढेल
3
चांदीच्या ताटात न दिलेल्या जेवणाची चर्चा जोरदार; आरोप-प्रत्यारोपांचा धुरळा
4
अहिल्यानगर हादरले! आठवीच्या विद्यार्थ्याने केला दहावीच्या विद्यार्थ्याचा खून; क्रिकेटचा वादातून शाळेतच संपवले
5
पंचगंगा, चंद्रभागेला पूर, भीमा नदीत ६३ हजार क्युसेकचा विसर्ग सुरू; विदर्भाला पावसाचा दिलासा 
6
अग्रलेख: इराण विरुद्ध इस्रायल; युद्ध संपले, की तात्पुरते थांबले?
7
समृद्धी महामार्गावर आता २४ तास खड्डे दुरुस्तीपथक; देखभाल-दुरुस्तीचे काम कंत्राटदारामार्फत नियमित
8
जमीन सरकारी, वापरण्याचा हक्क सरकारलाच; मोघरपाड्यात मेट्रो कार शेड उभारण्याचा मार्ग मोकळा
9
‘गडकरी’ सुरू झाल्याखेरीज ‘घाणेकर’ बंद होणार नाही! ठाणे महापालिकेने मांडली स्पष्ट भूमिका
10
विशेष लेख: माझ्या मनात पाल का चुकचुकते आहे?
11
विधानसभा निकाल रद्द करण्याची मागणी फेटाळली; याचिका करून कोर्टाचा वेळ वाया घालवला : हायकोर्ट
12
एसटी महामंडळाच्या २ हजार बसेस भंगारात; ‘एमएसटीसी’च्या माध्यमातून करण्यात येणार लिलाव
13
भरती-ओहोटीचे सर्वेक्षण वाढवणवासियांनी उधळले; आयटीडीसी पथकाला पिटाळले
14
उद्योगस्नेही वातावरणामुळे महाराष्ट्रात देशातील सर्वाधिक गुंतवणूक -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
15
तरुणांनी प्रामाणिकपणा, नवकल्पनांसह परंपरा पुढे न्यावी : मंत्री आदिती तटकरे
16
“मोदी माझे चांगले मित्र, व्यापार निवडला अन्...”; भारत-पाक युद्धविरामावर पुन्हा ट्रम्प बोलले
17
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
18
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
19
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
20
वीजग्राहकांसाठी आनंदाची बातमी! २६ टक्के वीजदर कमी होणार; CM फडणवीस म्हणाले, “इतिहासात प्रथमच…”

संतनगरीत आषाढी एकादशी उत्सव वैष्णवांचा मेळा

By admin | Updated: July 10, 2014 01:32 IST

विठ्ठलाच्या नामघोषासह गजाननाच्या गजराने संत नगरी शेगाव बुधवारी दुमदुमून गेली.

गजानन कलोरे / शेगावविठ्ठलाच्या नामघोषासह गजाननाच्या गजराने संत नगरी शेगाव बुधवारी दुमदुमून गेली. संत गजाननाच्या पालखीची परिक्रमा सुरू होताच, पावसाचे आगमन झाल्याने संत नगरीत जमलेल्या दीड लाख वैष्णवांच्या आनंदात भर पडली. आपली वारी कृतार्थ झाल्याचे समाधान वारकर्‍यांमधून व्यक्त झाले. बुधवारी दुपारी २ वाजता श्रींच्या पालखीतील श्री गजानन महाराजांच्या रजत मुखवट्याची संस्थानचे व्यवस्थापकीय विश्‍वस्त कर्मयोगी शिवशंकरभाऊ पाटील यांच्याहस्ते पूजा करण्यात आली. उपस्थित विश्‍वस्तांनीही श्रींची पूजा केली. त्यानंतर हरिनामाच्या गजरात श्रींची पालखी गज, अश्‍व आदी राजवैभवी थाटात नगर परिक्रमेकरिता निघाली. संतनगरीत गत दोन दिवसांपासून भजनी दिंड्यांचे आगमन सुरू होते. भजनी दिंड्यांना श्री गजानन महाराज संस्थानमधून महाप्रसाद देण्यात आला. श्रींच्या पालखीसमवेत संस्थानचे विश्‍वस्त नारायणराव पाटील, गोविंदराव कलोरे, अशोकराव देशमुख, विश्‍वेश्‍वर त्रिकाळ गुरूजी, अभियांत्रिकी कॉलेजचे रामेश्‍वर काठोळे, शरद शिंदे, मधुकर घाटोळ, प्राचार्य सोमाणी आदी सहभागी झाले होते. फुलवाले ढवळे यांनी श्रींच्या मेण्यावर फुलाची चादर भेट दिली. जुने महादेव मंदिराजवळ वारकर्‍यांना पांडे परिवाराच्यावतीने तसेच खडकावरील भक्त मंडळीकडून चहा देण्यात आला. संस्थानचे विश्‍वस्त किशोरबाबू टांक यांच्यावतीने आरा मशिनजवळ चहा देण्यात आला. जळगाव जामोद येथील सहाशेपेक्षा जास्त श्री गजानन भक्तांची जळगाव जामोद ते शेगाव पायदळ वारी दशमीला आली होती. माहेश्‍वरी भवन येथे दिंडी वारकर्‍यांना स्थानिक सुलताने व मित्र मंडळाने महाप्रसाद दिला. *श्रींच्या पंढरपूर शाखेतही उत्सवपंढरपूर येथील श्री गजानन महाराज संस्थानच्या शाखा कार्यालयात आलेल्या सर्व वारकर्‍यांना दशमी, एकादशी व बारस असा तीन दिवस महाप्रसाद वितरीत करणे सुरू आहे. श्री क्षेत्र पंढरपूर येथील श्रींच्या शाखेत ८ एकरात अडीच ते तीन लाख वारकर्‍यांचे मिष्ठान्नासह महाप्रसादाचे वितरण करून सेवार्पण होऊ घातली आहे. याकरिता संस्थानच्या पंढरपूर शाखेत शेगाव संस्थान येथून पाठविण्यात आलेला तांदूळ १८0 क्विंटल, साबुदाणा १३0 िक्वंटल, शेंगदाणे २0 क्विंटल, डालडा ९0 डबे, तेल ९0 डबे, बटाटा ५0 क्विंटल आदी साहित्यासह महाप्रसाद वितरीत करणे सुरू आहे. फराळासोबत १५ टन केळीसुद्धा पाठविण्यात आली. वारकर्‍यांच्या सेवेकरिता एक हजार सेवाधारी सेवा देत आहेत. आंध्रप्रदेश, कर्नाटक व महाराष्ट्रा तील २00 भजनी दिंड्यांना भजनी साहित्य, १0 टाळ जोड, वीणा, मृदंग, संत साहित्याचे वितरण करण्यात आले.