शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
3
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
4
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
5
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
6
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
7
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
10
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
11
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
12
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
13
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
14
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
15
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
16
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
17
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
18
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
19
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
20
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
Daily Top 2Weekly Top 5

वाशिम जिल्ह्यात तीन दिवसांत २९ हजार जणांचे लसीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2021 12:30 IST

Corona Vaccination : जिल्ह्यात १८ वर्षांवरील जास्तीतजास्त लोकांचे लसीकरण करण्यासाठी विशेष प्रयत्न केले जात आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : कोरोना संसर्गाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेपासून बचाव करण्यासाठी कोरोना प्रतिबंधक लस हा प्रभावी उपाय आहे. त्यामुळे जिल्ह्यात १८ वर्षांवरील जास्तीतजास्त लोकांचे लसीकरण करण्यासाठी विशेष प्रयत्न केले जात आहेत.  १ जुलैपासून सकाळी नऊ ते रात्री नऊ या वेळेत मोहिम सुरु ठेवली जात असून, गेल्या तीन दिवसांत २९४७९ लोकांचे लसीकरण करण्यात आले आहे.  कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेंतर्गत जिल्ह्यात कोविशिल्ड व कोव्हॅक्सिन या दोन लसी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. कोव्हॅक्सिन लसीचा दुसरा डोस २८ दिवसांनंतर, तसेच कोविशिल्ड लसीचा दुसरा डोस ८४ दिवसांनी दिला जातो. कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी पुरेशी रोगप्रतिकारकशक्ती तयार होण्याकरिता लसीचे दोन्ही डोस घेणे आवश्यक आहे. दुसऱ्या डोससाठी जिल्ह्यात कोव्हॅक्सिन लसीचा पुरेसा साठा उपलब्ध झाला असून, जिल्हा सामान्य रुग्णालय, सर्व ग्रामीण रुग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्रांसह इतर लसीकरण केंद्रांवर कोव्हॅक्सिन लस उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच या लसीकरण केंद्रांवर १८ वर्षांवरील नागरिकांना कोव्हॅक्सिन लसीचा पहिला डोसही दिला जात आहे. तसेच ४५ वर्षांवरील नागरिकांसाठी कोविशिल्ड लसीचा पहिला व दुसरा डोस जिल्ह्यातील सर्व ग्रामीण रुग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्रांवर उपलब्ध करून देण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अविनाश आहेर यांनी दिली. 

दुसऱ्या डोससाठी ऑनलाइन नोंदणीची गरज नाहीजिल्ह्यात सध्या १८ वर्षांवरील नागरिकांसाठी कोरोना प्रतिबंधक लसीकरण करण्यात येत असून, पहिल्या डोससाठी येताना १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांनी ‘कोविन’ ॲपवर नोंदणी करून अपॉईंटमेंट बुक करणे आवश्यक आहे. मात्र, ४५ वर्षांवरील नागरिक तसेच दुसरा डोस घेण्यासाठी येणाऱ्या नागरिकांनी ऑनलाइन नोंदणी करण्याची आवश्यकता नाही. त्यांनी आधार कार्ड घेऊन लसीकरण केंद्रावर यावे व लसीचा दुसरा डोस घ्यावा, असे आवाहन आरोग्य विभागामार्फत करण्यात आले आहे.

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसwashimवाशिम