शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

 पात्र २१ हजार शेतकऱ्यांच्या याद्या पोर्टलवर अपलोड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2020 15:33 IST

२२ फेब्रुवारी पासून बायोमॅट्रीक पद्धतीने आधार पडताळणी होणार आहे.

- नीलेश जोशी  लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: शेतकरी कर्जमुक्ती योजनेचे पोर्टल कार्यान्वीत होताच पहिल्याच दिवशी बुलडाणा जिल्हा केंद्रीय सहकारी बँकेने तब्बल २१ हजार ३३१ शेतकऱ्यांच्या कर्जखात्याची माहिती पोर्टलवर अपलोड करण्याची कमाल केली आहे. जिल्हा बँकेचा आयटी सेल आणि बँकेच्या ५३ शाखांमधील समन्वयामुळे हे शक्य झाल्याचे स्पष्ट होत आहे. विशेष म्हणजे राज्यात प्राधान्यक्रमाने अशा पद्धतीने शेतकºयांची कर्जखात्याची माहिती अपलोड करण्यात जिल्हा बँक प्राधान्यक्रमावर असल्याचे चित्र आहे.जिल्हा केंद्रीय सहकारी बँकेच्या २१ हजार ३२५ शेतकºयांना १३२ कोटी ३३ लाख ९७ हजार रुपयांची कर्जमाफी मिळाली असून एक फेब्रुवारी रोजी हे पोर्टल सुरू झाल्यानंतर रात्री साडेदहाच्या आत संपूर्ण माहिती अपलोड करण्यात आली असल्याची माहिती जिल्हा केंद्रीय बँकेचे सीईओ डॉ. अशोक खरात यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. महात्मा ज्योतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेचे पोर्टल एक फेब्रुवारी रोजी सुरू झाले. त्यात विहीत नमुन्यात पात्र शेतकºयांची माहिती अपलोड करण्यात येत आहे. ही संपूर्ण योजना ‘आधार’ बेस आहे. त्यामुळे शेतकºयांचे आधार कार्ड क्रमांक मिळविणे हे जिकरीचे काम होते. सोबतच ही माहिती अपलोड करताना त्यात प्रसंगी एखादा डॉट, स्पेस राहल्यास संपूर्ण फाईल रिजेक्ट होण्याचा धोका होता. मात्र त्या संदर्भाने जिल्हा बँकेने ५३ शाखामधील अधिकारी, कर्मचाºयाचंचे प्रशिक्षण घेऊन योजनेच्या अंमलबजावणीची पूर्व तयारी केली होती. त्यामुळे शेतकºयांच्या कर्जखात्याची माहिती ही तांत्रिकदृष्ट्या शुद्ध स्वरुपात बँकेच्या आयटी सेलला मिळाली व उभय विभागाच्या समन्वयाने ही माहिती पोर्टलवर अपलोड करणे शक्य झाले. १५ फेब्रुवारी पर्यंतच ही माहिती अपलोड करता येणार आहे. त्यामुळे आधार क्रमांक नसलेल्या शेतकºयांची अडचण होणार आहे. जिल्हा केंद्रीय बँकेच्या सहा शेतकºयांचे अद्याप आधार क्रमांक मिळालेले नाही. त्यांनाही त्यानुषंगाने व्यक्तीगत स्तरावर जिल्हा बँकेने पत्र देऊन त्यांची माहिती मागवली आहे. दरम्यान, माहिती अपलोड झाल्यानंतर २२ फेब्रुवारी पासून बायोमॅट्रीक पद्धतीने आधार पडताळणी होणार आहे.पडताळणी होताच कर्जाची रक्कम खात्यातशेतकºयांची बायामॅट्रीक पद्धतीने आधार पडताळणी होणार आहे. ही पडताळी झाल्यानंतर अर्थात बायोमॅट्रीक आॅथेंटीकेशन झाल्यांनंतर अवघ्या दोन दिवसात कर्जाची रक्कम शेतकºयांच्या खात्यात टाकण्याबाबतच्या प्रशासकीय पातळीवर सुचना आहेत. त्यामुळे ‘आधार’ बेस असलेल्या या योजनेला महत्त्व आले आहे.

गावपातळीवर झळकणार याद्याशेतकºयांच्या याद्या अपलोड झाल्यानंतर गाव पातळीवर त्या याद्या लावण्यात येणार असून सोबतच युनीक आयडींटीटी क्रमांकही त्यासाबेत राहणार आहे. त्यात कर्ज किती आहे, आधार क्रमांक याचीही माहिती राहिल. त्याबाबत काही शंका असल्यास आपले सेवा केंद्रावर शेतकरी बायोमॅट्रीक पडताळणी करावी लागले. याद्यातील माहिती योग्य असल्यास आॅथेंटीकेशनचा योग्य पर्याय निवडला जाईल. माहिती योग्य नसल्यास शेतकरी ती रिजेक्ट करू शकतात.

टॅग्स :buldhanaबुलडाणाFarmerशेतकरी