तालुक्यात झालेल्या वादळी वाऱ्यासह पावसामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे. तालुक्याच्या सीमावर्ती भागात पावसासह गारपीट झाली आहे. काही भागात सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास वादळी वाऱ्यासह मोठी गारपीट झाली आहे. विजेचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह पाऊस झाल्याने पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. या भागातील फळबागांसह रब्बी पिकाला मोठा फटका बसला आहे. ढगांच्या गडगडाटासह अनेक भागांत मध्यरात्री पावसाच्या हलक्या सरी पडल्या. त्यामुळे या भागातील वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. तालुक्यात ज्वारी, गहू, हरभरा, संत्रा, फळभाज्या अशी पिके आहेत. ज्वारी, गहू, हरभरा काढणीला आले आहेत. वादळ, पावसामुळे या पिकांचे नुकसान झाले आहे. सध्या ढगाळ वातावरण असून शेतकऱ्यांमध्ये या वातावरणामुळे काळजी निर्माण झाली आहे.
लोणार तालुक्यात अवकाळी पाऊस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2021 04:31 IST