शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

अवकाळी पाऊस आला खामगाव पालिकेच्या मदतीला धावून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2021 11:15 IST

Khamgaon Municipality : खामगाव शहरातील पाणीटंचाई दूर करण्यासाठी वाढीव पाणीपुरवठा योजनेद्वारे पाणीपुरवठा करण्याचे पालिकेचे प्रयत्न आहेत

- अनिल गवईलोकमत न्यूज नेटवर्कखामगाव : वाढीव पाणीपुरवठा कार्यान्वित करताना खामगाव पालिकेची चांगलीच दमछाक होत आहे. वाढीव पाणीपुरवठा योजनेंतर्गत अनेक भागात जलवाहिनीतून पाणी येण्याची नागरिकांची प्रतीक्षा  कायम आहे. त्याचवेळी अवकाळी पाऊस पालिका प्रशासनाच्या मदतीला धावला. त्यामुळे गत बुधवारी अनेक भागातील नळांना अचानक पाणी आले.खामगाव शहरातील पाणीटंचाई दूर करण्यासाठी वाढीव पाणीपुरवठा योजनेद्वारे पाणीपुरवठा करण्याचे पालिकेचे प्रयत्न आहेत. मात्र, गत अनेक वर्षांपासून वाढीव पाणी योजनेचे काम रखडले आहे. गत पाच वर्षांच्या कालावधीतही या योजनेचे काम पूर्णत्वास गेले नाही. परिणामी, संतविहार कॉलनीसोबतच शहराच्या काही भागातील नागरिकांच्या नळाला पाण्याचा एकही थेंब येत नाही. पाणीपुरवठा होत नाही. त्याचवेळी नळाच्या पाणीपट्टीचे देयक मात्र, या भागातील नागरिकांना विना विलंब पोहोचते. शहरातील अंतर्गत जलवाहिनी दुरुस्तीची समस्या जटिल बनली आहे. वर्ष-दीड वर्षांचा कालावधी लोटल्यानंतरही जलवाहिनीची गळती दुरुस्ती केली जात नाही. त्यामुळे शहरातील नळांद्वारे दूषित पाणीपुरवठ्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. गळती लागलेल्या जलवाहिनीची दुरुस्तीच होत नसल्याने, पावसाचे साचलेले पाणी जलवाहिनीद्वारे नळांना पोहोचत असल्याचे प्रकारही शहरात अनेकदा घडतात. पाणीपुरवठ्याच्या दिवशी नळांना एकही थेंब येत नसताना, पाऊस आल्यानंतर, तसेच सांडपाणी जलवाहिनीत शिरल्यानंतर काही भागातील नळांना पाणी येते. या समस्येबाबत वारंवार तक्रार केल्यानंतरही पालिकेतील दप्तर दिरंगाईमुळे जलवाहिनी दुरुस्ती आणि गळतीचे काम तक्रारीनंतर तब्बल दीड-दोन वर्षांपर्यंत पूर्णत्वास जात नसल्याची वस्तुस्थिती समोर येत आहे. 

टॅग्स :khamgaonखामगावRainपाऊस