शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

बुलढाणा जिल्ह्यात अवकाळी पावसाची हजेरी

By निलेश जोशी | Updated: February 26, 2024 20:03 IST

बुलडाणा शहरात सांयकाळी सात वाजता अवकाळी पावसाने अचानक हजेरी लावली. जवळपास २० मिनिटे हा अवकाळी पाऊस पडला आहे.

बुलढाणा: जिल्ह्यात अवकाळीपावसाने हजेरी लावल्याने हवेत पुन्हा गारवा निर्माण झाल आहे. दरम्यान जिल्ह्यातील घाटाखालील काही भागात तुरळकस्वरुपात गारपीट झाल्याची माहिती. जिल्ह्यात प्रामुख्याने मलकापूर, नांदुरा, बुलढाणा, देऊळगाव राजा व मराठवाड्या लगतच्या पट्ट्यात अवकाळी पावसाने हजेरी लावल्याचे वृत्त आहे.

यासंदर्भाने नागपूर येथील प्रादेशिक हवामान केंद्राने दोन दिवसापूर्वी तसा इशारा दिला होता. त्यानुषंगाने २६ आणि २७ फेब्रुवारी रोजी बुलढाणा जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह अवकाळीपावसाची शक्यता व्यक्त केल्या गेली होती. काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह गारपिट होईल, असाही इशारा दिला गेला होता. त्या पार्श्वभूमीवर बुलढाणा जिल्ह्यात सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास नांदुरा तालुक्यातील येरळी, खरकुंटी, पलसोडा, भोटा, हिंगणाह मलकापूर, जळगाव जामोद, देऊळगाव राजा तालुक्यातील धोत्रानंदई, अंढेरा परिसरासह काही भागात अवकाळी पाऊस व तुरळक स्वरुपात गारपीट झाल्याचे वृत्त आहे.

बुलडाणा शहरात सांयकाळी सात वाजता अवकाळी पावसाने अचानक हजेरी लावली. जवळपास २० मिनिटे हा अवकाळी पाऊस पडला आहे. यासोबतच मराठवाड्यालगतच्या धाड परिसरातही  अवकाळी पाऊस झाल्याचे आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडून सांगण्यात आले.दरम्यान, २७ फेब्रुवारी रोजीही जिल्ह्यात अवकाळी पावसाची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी कापणी, मळणी केलेला शेतमाल व तोडणी केलेली फळे, भाजीपाला सुरक्षीत ठिकाणी साठवून ठेवावा. जेणेकरून गारपीटीुळे तो खरबा होणार नाही. यासोबतच खराब हवामान पहाता आपली गुरे सुरक्षीतस्थळी बांधून ठेवावीत.

जिल्ह्यात अवकाळी पावसाचा इतिहासबुलढाणा जिल्ह्यात गेल्या ४० वर्षपासून अवकाळी पाऊस पडण्याचा इतिहास आहे. प्रामुख्याने जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात हा अवकाळी पाऊस पडत असल्याच्या महसूल विभागाकडे नोंदी आहे. दरम्यान मार्च महिन्यात सैलानी यात्रेदरम्यानही अवकाळी पावसाची तसेच गारपीटी होण्याचा जिल्ह्याचा जुना इतिहास आहे.

टॅग्स :Rainपाऊसbuldhanaबुलडाणा