शहरं
Join us  
Trending Stories
1
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
2
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
3
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे
4
टीम इंडियाला ज्या ज्या कंपन्यांनी स्पॉन्सर केले, त्यापैकी तीन कंपन्या बुडाल्या, बंद झाल्या...
5
'जत्रा २' येणार का? दिग्दर्शक केदार शिंदे म्हणाले, "मनापासून इच्छा आहे पण..."
6
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर; ३१ जानेवारी २०२६ पर्यंत मुदतवाढ, सुप्रीम कोर्टात काय घडलं?
7
बाजारात 'सुपर' तेजी! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी उसळी; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
8
भारतावर आणखी टॅरिफ लावण्याची धमकी अमेरिकेवरच उलटू शकते, जाणून घ्या का?
9
गायीने कहरच केला... धावता-धावता उडी मारून थेट कौलावरच चढली, Video पाहून व्हाल थक्क
10
Pitru Paksha 2025: पितृ पक्षात एखादी अंत्ययात्रा दिसणे शुभ की अशुभ? काय करावे उपाय? वाचा
11
सोन्याच्या किंमतीनं रचला इतिहा, विक्रमी पातळीवर पोहोचला भाव; पटापट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट!
12
झोमॅटोने रचला नवा विक्रम! टाटा-अदानी समुहातील मोठ्या कंपन्यांनाही 'या' बाबतीत टाकलं मागे
13
"जे झालं ते अचानक अन् चुकून झालं"; BMW कार अपघातातील आरोपी मागतेय जामीन
14
अपोलो टायर्स प्रत्येक मॅचमागे ४.५ कोटी रुपये मोजणार; टीम इंडियाला नवा स्पॉन्सर मिळाला
15
इस्राइल-गाझाचं उदाहरण देत शाहिद आफ्रिदीने भारताविरोधात ओकली गरळ, मोदींबाबत म्हणाला... 
16
धोक्याची घंटा! कच्ची केळी बादलीत टाकली अन् १ मिनिटात पिकली; लोकांच्या जीवाशी खेळ?
17
दबंग सून... मध्यरात्री गुंडांना घेऊन सासरी आली आणि केला धडाधड गोळीबार, त्यानंतर...  
18
IND vs PAK: पाकिस्तान जय शाहला घाबरला; आधी 'बड्या बाता' केल्या, आता गपचूप बसला, काय घडलं?
19
स्विगीने खास पुणेकरांसाठी लाँच केले 'Toing' ॲप; केवळ ५० रुपयांत मिळणार भरपेट जेवण, काय आहे वैशिष्ट्ये?

ग्राम परिवर्तकांवर बेरोजगारीची कुऱ्हाड!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2020 14:38 IST

हे अभियान बंद पडणार असल्याचे माहिती पडल्यावर राज्यभरात काम करणाऱ्या ५०० हून अधिक ग्राम परिवर्तकांना धक्काच बसला आहे.

- योगेश फरपटलोकमत न्यूज नेटवर्कखामगाव: भाजप सरकारने सिएसआरची मदत घेत ग्राम सामाजिक परिवर्तन हे अभियान राबविण्यास सुरवात केली होती. राज्यातील २५ जिल्ह्यामध्ये अनेक गावांचा कायापालट करण्यास अभियानाला यशही आले. मात्र अचानक हे अभियान बंद पडणार असल्याचे माहिती पडल्यावर राज्यभरात काम करणाऱ्या ५०० हून अधिक ग्राम परिवर्तकांना धक्काच बसला आहे.महाराष्ट्रातील मुंबईसह पश्चिम भागाचा विकास मोठ्या प्रमाणात झाला असला तरी विदर्भ, मराठवाडा व कोकण या भागातील ग्रामीण व आदिवासी भागात अजूनही विकासाच्या बाबतीत अधिक प्रयत्न करणे गरजेचे आहे. महाराष्ट्र शासन व विविध शासकीय व निमशासकीय संस्था या भागांच्या विकासासाठी प्रयत्नशील आहेत. परंतू, अद्यापही शासनाच्या कल्याणकारी योजना दुर्गम व अतिमागास क्षेत्रात राहणाºया शेवटच्या घटकांपर्यंत पोचवितांना शासनाला अडचणी येत असल्याने महाराष्ट्रात औद्योगिक क्षेत्रातील अग्रणी असलेल्या कंपन्या जसे, एच.यु.एल., एच.टी. पारेख, महिन्द्रा, रिलायन्स, टाटा ट्रस्ट इ. या सारख्या कंपन्या सामाजिक दायित्व प्रकल्पाच्या माध्यमातून स्वच्छता, आरोग्य, पोषण, कृषी, जलसंधारण अशा विविध क्षेत्रात कार्यरत आहेत. अशा कंपन्यांच्या भागीदारीतून महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात शाश्वत विकासाचे मॉडेल तयार करण्यासाठी महाराष्ट्र शासन आणि कॉपोर्रेट कंपन्यांसोबत आॅगस्ट २०१६ मध्ये पहिली बैठक झाली. त्यातुनच निर्माण झालेल्या ग्राम सामाजिक परिवर्तनाच्या माध्यमातून राज्यातील १००० अतिमागास गावांची निवड झाली. याठिकाणी उच्चशिक्षित ग्राम परिवर्तकांवर सामाजिक-आर्थिक विकासाला चालना व गती देण्यावर भर देण्यात आला. बुलडाणा, अकोला, यवतमाळ या जिल्ह्याप्रमाणेच २५ जिल्हयाातील ठरावीक गावात पायाभूत सुविधा, रोजगार, आरोग्य, शिक्षण, महिला सक्षमीकरण यावर भर देण्यात आला. हे अभियान बंद होत असल्याने ३४ जिल्ह्यातील १ हजाराहून अधिक जणावर बेरोजगारीची कुºहाड कोसळली आहे.

विभागीय आयुक्तांनी घेतला आढावाअमरावती विभागातील कार्याचा आढावा घेण्यासाठी फेब्रुवारी महिन्यात विभागीय आयुक्तांच्या दालनात महत्वाची बैठक घेण्यात आली. या बैठकीत ग्राम परिवर्तकांनी केलेल्या कामाचा व प्रलंबीत कामाचा आढावा घेण्यात आला होता. चार वर्षापासून अविरतपणे विकासाची धुरा सांभाळणाºया उच्चशिक्षीत ग्राम परिवर्तकांना अचानक नोकरी जाण्याचा धक्का बसला आहे. तुर्तास ३१ मार्च पर्यंत अभियान सुरु राहणार आहे. मात्र पुढे अभियानाचे काय होईल हे काहीही सांगता येणार नाही अशी माहिती सुत्रांनी दिली.

टॅग्स :khamgaonखामगावbuldhanaबुलडाणा