शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

स्वच्छ भारत मिशन अंतर्गत चार कोटी निधी वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2017 19:34 IST

जिल्ह्यात स्वच्छ भारत मिशन अंतर्गत चार कोटींचा निधी वाटप करण्यात आला. स्वच्छ भारत मिशनच्या कामांना गती येण्यासाठी जिल्हा स्तरावरून चिखली तालुक्यासाठी दीड कोटी, सिंदखेड राजा तालुक्यासाठी एक कोटी, लोणार तालुक्यासाठी पन्नास लाख, मेहकर तालुक्यासाठी एक कोटी असा एकूण चार कोटी निधी वितरीत करण्यात आला आहे.

ठळक मुद्देस्वच्छ भारत मिशनच्या कामांना गती येण्यासाठी चार कोटी निधी वितरीत लाभार्थ्यांना बारा  हजार रूपये प्रोत्साहन निधी 

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : जिल्ह्यात स्वच्छ भारत मिशन अंतर्गत चार कोटींचा निधी वाटप करण्यात आला. स्वच्छ भारत मिशनच्या कामांना गती येण्यासाठी जिल्हा स्तरावरून चिखली तालुक्यासाठी दीड कोटी, सिंदखेड राजा तालुक्यासाठी एक कोटी, लोणार तालुक्यासाठी पन्नास लाख, मेहकर तालुक्यासाठी एक कोटी असा एकूण चार कोटी निधी वितरीत करण्यात आला आहे. सदर निधी हा लाभार्थींना वैयक्तिक शौचालय बांधकाम करून वापरासाठी प्रोत्साहन बक्षिस आहे. याकरिता पात्र लाभार्थ्यांनी आपले प्रस्ताव ग्रामपंचायतकडे तत्काळ सादर करावे. वैयक्तिक शौचालय बांधले असतील अशा पात्र लाभार्थ्यांचे प्रस्ताव  ग्रामसेवकांनी तयार करून तत्काळ पंचायत समिती कार्यालयातील स्वच्छ भारत मिशनकडे सादर करावे, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी शन्मुगराजन एस. यांनी केले आहेशौचालय बांधकाम आणि त्याचा नियमित वापर करण्यासाठी शासनस्तरावर लाभार्थ्यांना बारा  हजार रूपये प्रोत्साहन निधी दिला जातो. या रकमेमध्ये दोन शोषखड्ड्यांचे अगदी  उपयुक्त शौचालय  तयार होतो. करिता उर्वरीत पात्र लोकांनी लवकरात लवकर शौचालय बांधून या योजनेचा लाभ घ्यावा. तसेच इतर तालुक्यात अजून निधी उपलब्ध आहे. बुलडाणा ५७ लाख, देऊळगाव राजा १० लाख, खामगाव ५२ लाख,  शेगाव ६ लाख,  संग्रामपूर ३० लाख, जळगाव जा. ७२ लाख, नांदुरा ६० लाख,  मलकापूर १० लाख, तर मोताळा ७६ लाख रूपयांचा निधी उपलब्ध आहे.  यामध्ये खामगाव समितीकडे पुवीर्चा निधी उपलब्ध असल्याने त्यांना निधी देण्यात आला नाही. तर  मलकापूर आणि शेगाव  प्रत्येकी २५ हजार रुपये याप्रमाणे निधी वितरित करण्यात आला आहे.