शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
4
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
5
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
6
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
7
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
8
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
9
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
10
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
11
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
12
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
13
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
14
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
15
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
16
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
17
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
18
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
19
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
20
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
Daily Top 2Weekly Top 5

महसूल विभागातंर्गत ११८ पदे रिक्त, प्रशासकीय यंत्रणेवर पडतोय ताण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2017 13:15 IST

बुलडाणा : राज्यातील महसूल विभागातंर्गत पदपुनर्रचनेसंदर्भात दोन वर्षापूर्वी नियुक्त करण्यात आलेल्या समितीचा अहवाल अद्याप प्राप्त झालेला नसतानाच जिल्हाधिकारी कार्यालय तथा महसूल शाखेतंर्गत जिल्ह्यात जवळपास ११८ अधिकारी, कर्मचार्यांची पदे रिक्त असल्याची माहिती समोर आली आहे.

ठळक मुद्देआढावा बैठकीदरम्यान समोर आली बाब

बुलडाणा : राज्यातील महसूल विभागातंर्गत पदपुनर्रचनेसंदर्भात दोन वर्षापूर्वी नियुक्त करण्यात आलेल्या समितीचा अहवाल अद्याप प्राप्त झालेला नसतानाच जिल्हाधिकारी कार्यालय तथा महसूल शाखेतंर्गत जिल्ह्यात जवळपास ११८ अधिकारी, कर्मचार्यांची पदे रिक्त असल्याची माहिती समोर आली आहे. मुख्यमंत्र्याच्या रद्द झालेल्या आढावा बैठकीच्या अनुषंगाने प्रशासकीय पातळीवर घेण्यात आलेल्या आढाव्या दरम्यान ही बाब समोर आली आहे.बुलडाणा जिल्ह्यातील मुख्यमंत्र्यांच्या वॉररुमतंतर्गत समाविष्ठ असलेल्या जिगाव प्रकल्पासह अन्य काही प्रकल्पांचा असलेला समावेश, राष्ट्रीय महामार्गासाठी कराव्या लागणार्या भूसंपादनाचा विषय, नैसर्गिक आपत्तीचे बदलते स्वरुप यामुळे तहसिल स्तरावर वाढलेला कामाचा ताण, अनुदान स्वरुपात शासनाकडून मिळणारा निधी वाटपाचा ताण या सर्व कामांचा ताण पाहता जिल्ह्यात रिक्तपदांची समस्या महसूली यंत्रणेला भेडसावत आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी जिल्ह्याच्या आढावा बैठकीमध्ये प्राधान्याने रिक्तपदाचा विषयाची सविस्तर माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाकडून मागवली होती. मात्र तांत्रिक अडचणीमुळे अमरावतील गेल्या आठवड्यात होणारी ही बैठक पुढे ढकलण्यात आली होती. 

अधिकार्यांची दहा पदे रिक्त जिल्हाधिकार्यानंतर जिल्ह्याचा डोलारा सांभाळणारे अपर जिल्हाधिकारी पदच बुलडाण्यात रिक्त आहे. या व्यतिरिक्त १४ उपजिल्हाधिकार्यांची जिल्ह्याला गरज असताना १२ उपजिल्हाधिकारी कार्यारत आहेत. तहसिलदारांचीही १८ पैकी चार पदे रिक्त असून ७० पैकी तीन नायब तहसिलदारांची पदे भरणे आवश्यक आहे.

 कर्मचार्यांचीही संख्या कमी जिल्ह्यात अव्वल कारकून ते शिपायापर्यंतची १०८ पदे रिक्त आहेत. जिल्हयात १३२९ पदांची गरज असताना प्रत्यक्षात १२२० पदेच कार्यरत आहे. यामध्ये लिपीक टंकलेखकांची ३४ पदे रिक्त आहेत. शिपायांचीही २४ पदे रिक्त आहे. अव्वल कारकून, लिपीक टंकलेखक, मंडळ अधिकारी, वाहन चालक, तलाठ्यांची मिळून ८४ पदे रिक्त आहेत. तलाठी वर्गाचीही ३६ पदे रिक्त असल्याने सध्याच्या पैसेवारी काढण्याच्या दिवसामध्ये महसूल यंत्रणेवर ताण आला आहे. पैसेवारी गाव समितीचीही त्यामुळे अडचण होत आहे.

टॅग्स :Governmentसरकारcollectorतहसीलदार