शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
5
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
6
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
7
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
8
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
9
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
10
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
11
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
12
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
13
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
14
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
15
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
17
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
18
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
19
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
20
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

जल जीवन मिशनअंतर्गत १२५५ गावांचे कृती आराखडे तयार करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2021 04:21 IST

जिल्ह्यातील ग्रामीण भागात २०२४ पर्यंत प्रत्येक कुटुंबापर्यंत नळजोडणीद्वारे पाणी पुरवठा करण्याचे उद्दिष्ट सध्या हाती घेण्यात आले आहे. त्यानुषंगाने प्राधान्याने ...

जिल्ह्यातील ग्रामीण भागात २०२४ पर्यंत प्रत्येक कुटुंबापर्यंत नळजोडणीद्वारे पाणी पुरवठा करण्याचे उद्दिष्ट सध्या हाती घेण्यात आले आहे. त्यानुषंगाने प्राधान्याने हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. त्यामुळे ग्रामस्तरावर गाव कृती आराखडा तयार करण्याच्या या प्रक्रियेत गावांनी सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा परिषद अध्यक्षा मनीषा पवार यांनी केले आहे.

दरम्यान, या पंधरवड्यांतर्गत ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता, उपअभियंता, शाखा अभियंता आणि जिल्हा कक्षाचे सनियंत्रण मूल्यमापन सल्लागार यांना ऑनलाइन गाव कृती आराखडे तयार करण्याचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. यात माहिती संकलन, राबविण्याच्या प्रक्रियेसह अन्य बाबींची माहिती व प्रशिक्षण दिले जाणार आहे. यासोबतच पाणी व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामपंचायत विभाग, उपअभियंता, शाखा अभियंता, भूवैज्ञानिक, मनुष्यबळ विकास सल्लागार, पाणी गुणवत्ता सल्लागार, तालुकास्तरीय गटविकास अधिकारी, विस्तार अधिकारी व संबंधितांनाही दुसऱ्या टप्प्यात प्रशिक्षण देण्यात येत आहे. यासोबतच २८ व २९ जुलै रोजी ग्रामपातळीवर सरपंच, ग्रामसेवक, जलसुरक्षक, पंप ऑपरेटर, आशा वर्कर्स, ग्राम पाणीपुरवठा व स्वच्छता समितीच्या दोन प्रतिनिधींनाही प्रशिक्षण दिले जाईल.

- मान्यतेसाठी ग्रामसभेत ठेवणार

स्वातंत्र्यदिनी होणाऱ्या ग्रामसभेमध्ये बनविण्यात आलेले हे गाव कृती आराखडे मान्यतेसाठी ठेवण्यात येणार आहेत. त्यामुळे यासंदर्भातील कामांना प्राधान्य दिले जावे. सोबतच मधल्या काळात या कृती आराखड्यांची पडताळणीही करण्यात येणार आहे. त्यामुळे या अभियानात ग्रामस्तरावरून मोठा सहभाग असणे आवश्यक असल्याचे पवार यांनी स्पष्ट केले.