मेहकर येथील विशाल अशोक शिरपूरकर यांनी पोलीस स्टेशन मेहकर येथे तक्रार दिली आहे. १२ मार्च रोजी त्यांच्या घरासमोर उभी केलेली दुचाकी (क्रमांक एम.एच. २८. ए. डब्ल्यू. १५५३) अज्ञात चोरट्याने चोरून नेली होती. यावरून मेहकर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी नमूद गुन्ह्यात आरोपी सचिन ऊर्फ राजू रामाखिल्ल्लारे (वय २६, रा. गडदगव्हाण, ता.जिंतूर, जि. परभणी) यास ताब्यात घेतले असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्याच्याकडून गुन्ह्यात चोरीस गेलेली दुचाकी जप्त करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया यांच्या मार्गदर्शनाखाली पो.नि. आत्माराम प्रधान, सपोनि युवराज रबडे, पोलीस हेड काॅन्स्टेबल गोविंद चव्हाण, नापोका संजय धिके, श्रीकांत गाडे व गणेश लोढे हे करीत आहेत.
दुचाकी चोरट्यास अटक - A
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2021 04:35 IST