शेगाव (जि. बुलडाणा), दि. २२- बुधवारी भरदिवसा दोन जागी घरफोडीची घटना घडली असून, चोरट्यांनी लाखोंचा ऐवज लंपास केला. या प्रकरणी पोलिसांनी तपास चक्रे वेगात फिरवित सीसी क ॅमेर्याच्या फुटेजद्वारे चोरट्यांचा सुगावा मिळविला असून, पोलीस पथक चोरट्यांच्या मागावर रवाना झाले आहे. शहरानजीकच्या रोकडियानगरात जुन्या चिंचोली रस्ता वहिवाटीला लागून गोरक्षणसमोर राहणारे नीलेश भीमराव इंगोले यांचे घरी कोणी नसताना घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी कपाटामधील ५0 गॅ्रम सोन्याचे दागिने व रोख २0 हजार रुपये लंपास केल्याचे आढळून आले. घटनेच्यावेळी नीलेश इंगोले हे ड्यूटीवर गेले होते, तर पत्नी ही घराला कुलूप लावून मेहंदीच्या क्लासला व मुले शाळेत गेली होती. चोरट्यांनी कुलूप तोडून घरात प्रवेश केला व घरातील १ लाख ७0 हजार रुपयांचा ऐवज लंपास केला.
शेगावात भरदिवसा दोन घरफोडी
By admin | Updated: March 23, 2017 02:32 IST