शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

अनियंत्रित रुग्णवाहिकेने पाच जणांना चिरडले; दोन ठार, तीन गंभीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2021 18:34 IST

Buldhana Accident News अपघातामध्ये अनिल पडोळकर आणि माया पडोळकर यांचा मृत्यू झाला आहे.

ठळक मुद्देदोघांचा मृत्यू झाला असून तीन जणांची प्रकृती गंभीर आहे.टायर फुटल्याने त्याचे रुग्णवाहिकेवरील नियंत्रण सुटले. चालक रामदास पुंजाजी जाधव (कोलवड) यास अटक केली आहे.

बुलडाणा: शहरातील त्रिशरण चौक परिसरात धावत्या रुग्णवाहिकेचे समोरील चाकाचे टायर फुटल्याने रस्त्याच्याकडेला पालामध्ये झोपलेले पाच जण चिरडल्या गेल्याची घटना १६ मार्च रोजी मध्यरात्री घडली. दरम्यान, यातील दोघांचा मृत्यू झाला असून तीन जणांची प्रकृती गंभीर आहे. तिघाही गंभीर जखमीवर अकोला येथील रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे.या  अपघातामध्ये अनिल पडोळकर आणि माया पडोळकर यांचा मृत्यू झाला आहे. अनिल पडोळकर याचा बुलडाणा जिल्हा सामान्य रुग्णालयात तर माया पडोळकर हिचा अकोला येथील रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. अपघातातील बेबीबाई शेषराव सोळंकी, शेषराव सोळंकी आणि आकाश पडोळकर यांच्यावर अकोला येथील रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे. त्यांचीही प्रकृती गंभीर असल्याची माहिती पोलिस सुत्रांनी दिली. या प्रकरणी पोलिसांनी रुग्णवाहिका चालक रामदास पुंजाजी जाधव (कोलवड) यास अटक केली आहे. सध्या पोलिस त्याची चौकशी करत आहेत.

एमएच-२८- बी-७१३६ क्रमांकाची रुग्णवाहिका घेवून रामदास पुंजाजी जाधव हा चालक मेहकर येथे एका मृत व्यक्तीचे पार्थिव घेवून गेला होता. दरम्यान रात्री एक वाजेच्या सुमारास मेहकरवरून बुलडाणा शहरात तो परत आला होता. दरम्यान महावितरण कार्यालयाकडून त्रिशरण चौकाकडे जात असताना त्याच्या रुग्णवाहिकेच्या समोरील चाकाचे टायर फुटल्याने त्याचे रुग्णवाहिकेवरील नियंत्रण सुटले. व रस्त्याच्या कडेला पालामध्ये झोपलेल्या चिखली तालुक्यातील सोळंकी व पडोळकर कुटुंबाच्या पालामध्ये त्याची रुग्ण वाहिका घुसली. त्यामध्ये उपरोक्त पाचही जण गंभीर जखमी झाले.या घटनेची माहिती मिळताच बुलडाणा शहर पोलिसांनी त्वरित घटनास्थळ गाठून जखमींना बुलडाणा जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी हलविले. यातील अनिल पडोळकर याचा बुलडाणा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला तर गंभीर अवस्थेतील अन्य चौघांना अकोला येथे उपचारासाठी हलविण्यात आले. अकोला येथे रुग्णालयात उपचारादरम्यान माया पडोळकर यांचा मृत्यू झाला. अन्य तिघांवर तेथे उपचार करण्यात येत आहे. पडोळकर व सोळंकी कुटुंब हे बुलडाणा शहरात त्रिशरण चौक परिसरात विळे, कुऱ्हाडी, तवे विकण्याचे काम करत होते. रस्त्याच्या कडेलाच ते पाल टाकून झोपत होते. या प्रकरणी पोलिसांनी रुग्णवाहिका चालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

 डाव्या बाजूकडील टायर फुटलेरुग्णवाहिकेचे समोरील डाव्या बाजूचे टायर फुटल्याने हा अपघात घडला. यात चालक रामदास पुंजाजी जाधव याचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि रस्त्याच्या कडेलाच पालामध्ये झोपलेल्या या कुटुंबतील दोघांचा मृत्यू झाला. सध्या पोलिसांनी रुग्णवाहिकाही ताब्यात घेतली असून चालक रामदास पुंजाजी जाधव याची चौकशी करण्यात येत असल्याचे तपासी अधिकारी जयसिंग पाटील यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :buldhanaबुलडाणाAccidentअपघात