शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
4
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
5
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
6
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
7
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
8
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
9
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
10
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
11
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
12
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
13
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
14
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
15
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
16
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
17
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
18
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
19
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
20
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
Daily Top 2Weekly Top 5

 खामगाव-चिखली मार्गावर दोन अपघातात दोन जण ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2021 11:24 IST

Khamgaon-Chikhali road accident पहिला अपघात हा कव्हाळा फाट्यानजीक तर दुसरा अपघात उंद्री-लालमाती नजीक घडला.

ठळक मुद्देदत्तात्रय शेळके हे जागीच ठार झाले तर विष्णू शेळके हे गंभीर जखमी झाले आहेत.गोविंद नसवाले हे जागीच ठार झाले.

लोकमत न्यूज नेटवर्कअमडापूर: चिखली-खामगाव मार्गावर २३ फेब्रुवारी रोजी झालेल्या दोन वेगवेगळ्या अपघातामध्ये दोघे जण ठार झाले, तर एक जण गंभीर जखमी झाला  आहे. यातील पहिला अपघात हा कव्हाळा फाट्यानजीक तर दुसरा अपघात उंद्री-लालमाती नजीक घडला.पहिला अपघात कव्हाळा फाट्यानजीक एसटी बसने दुचाकीला धडक दिल्याने झाला. यात एक जण ठार तर एक जण गंभीर जखमी आहे. दुसरा अपघात हा एका मालवाहू वाहनाने दुचाकीला धडक दिल्याने झाला. २३ फेब्रुवारी रोजी सकाळी ९ वाजताच्या सुमारास ईसोली येथील दत्तात्रय श्रीराम शेळके (४८) व विष्णू मुरलीधर शेळके (दोघे  रा. ईसोली) हे कव्हाळा येथे दुचाकीवर जात असताना शेगाव-पुणे (एमएच-१३-सीयू-६९२७) या बसची दुचाकीला जबर धडक बसली. त्यात दत्तात्रय शेळके हे जागीच ठार झाले तर विष्णू शेळके हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर चिखली येथील खासगी रुग्णालयात उपचार करण्यात येत असल्याची माहिती रामभाऊ तुळशीराम शेळके (रा. ईसोली) यांनी दिली.दरम्यान, दुसरा अपघात उंद्री गावानजीक लालमातीजवळ घडला. उंद्री येथील रहिवासी गोविंद रामराव नसवाले हे लालमातीकडून उंद्रीकडे दुचाकीवर (क्रमांक एमएच-२८ एक्स-६७६६) जात होते. त्यावेळी पाठीमागून येणाऱ्या मालवाहू वाहनाने (क्र. एमएच-२७-एक्स-७७८४) दुचाकीला जबर धडक दिली. त्यात  गोविंद नसवाले हे जागीच ठार झाले. या घटनेची माहिती श्रीकांत भास्करराव राऊत (३५, रा. उंद्री) यांनी अमडापूर पोलीस ठाण्यात दिली. 

टॅग्स :Accidentअपघातbuldhanaबुलडाणा