मालवाहू वाहनाची दुचाकीस धडक : एक ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2021 04:32 AM2021-04-14T04:32:18+5:302021-04-14T04:32:18+5:30

दुसरबीड : रस्त्याच्या कडेला उभा असलेला युवक भरधाव मालवाहू वाहनाने धडक दिल्याने जागीच ठार झाला़ ही घटना दुसरबीडजवळ १३ ...

Two killed in car accident | मालवाहू वाहनाची दुचाकीस धडक : एक ठार

मालवाहू वाहनाची दुचाकीस धडक : एक ठार

Next

दुसरबीड : रस्त्याच्या कडेला उभा असलेला युवक भरधाव मालवाहू वाहनाने धडक दिल्याने जागीच ठार झाला़ ही घटना दुसरबीडजवळ १३ एप्रिल राेजी घडली. अमोल रामदास जाधव असे मृतक युवकाचे नाव आहे़

केशव शिवनी येथील अमोल रामदास जाधव हा बांधकाम मजूर व त्याचे वडील रामदास जाधव हे काही कामानिमित्त दुसरबीड येथे दुचाकीने आले हाेते. दुसरबीड येथील काम आटाेपल्यानंतर रामदास जाधव यांनी फर्निचरच्या दुकानात काम असल्याने दुचाकी रस्त्याच्या बाजूला उभी केली. तसेच रामदास जाधव हे दुकानात गेले, तर अमाेल जाधव हा दुचाकी (क्र. एमएच २१ यु ६१६६) जवळ उभा हाेता़ यावेळी नाव्हा येथून अंगूर घेऊन येत असलेल्या मालवाहू वाहन (क्र. एमएच २८ एबी ५५४६) ने दुचाकी व अमाेल जाधव यास जबर धडक दिली़ यामध्ये अमाेल जाधव जागीच ठार झाला़ मालवाहू वाहनाने समाेर उभ्या असलेल्या कार (क्र. एम एच २० सीएच ६०६६)लाही धडक दिली़ यामध्ये कारचे माेठ्या प्रमाणात नुकसान झाले़ घटनेची माहिती मिळताच किनगाव राजा पोलीस स्टेशनचे दुसरबीडचे जमादार चाटे व पोलीस कॉन्स्टेबल शिवाजी बारगजे यांनी घटनास्थळ गाठले व तातडीने मृतदेह उत्तरीय तपासणी करता रवाना केला़ मालवाहू वाहनचालकास पाेलिसांनी ताब्यात घेतले आहे़

Web Title: Two killed in car accident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.