लोकमत न्यूज नेटवर्कबिबी : भरधाव मालवाहू वाहनाने दुचाकीस धडक दिल्याने दाेन जण ठार झाले. ही घटना औरंगाबाद-नागपूर या महामार्गावरील बिबी गावानजीक १४ डिसेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता घडली. भगवान श्रीराम चव्हाण व प्रकाश रामकिसन वानखेडे दाेघेही राहणार बिबी अशी मृतकांची नावे आहेत. भगवान श्रीराम चव्हाण व प्रकाश रामकिसन वानखेडे हे शेतातील काम आटाेपून साेमवारी सायंकाळी दुचाकी क्र. एमएच २८ बीजे ३६०६ ने बिबी गावाकडे परत येत हाेते. दरम्यान, बिबी गावाजवळ समाेरून येत असलेल्या मालवाहू वाहन क्र. एमएच २१ बीएच १२३२ ने त्यांच्या दुचाकीस जबर धडक दिली. या अपघातात दुचाकीवरील प्रकाश रामकिसन वानखेडे हे जागीच ठार झाले तर भगवान श्रीराम चव्हाण हे गंभीर जखमी झाले हाेते. माहिती मिळताच बिबी पाेलिसांनी घटनास्थावर धाव घेऊन जखमीस रुग्णालयात दाखल केले. उपचार सुरू असताना भगवान चव्हाण यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू हाेती.
औरंगाबाद-नागपूर महामार्गावर मालवाहू वाहन, दुचाकी अपघातात दोन ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2020 12:31 IST
Buldhana Accident News भगवान श्रीराम चव्हाण व प्रकाश रामकिसन वानखेडे दाेघेही राहणार बिबी अशी मृतकांची नावे आहेत.
औरंगाबाद-नागपूर महामार्गावर मालवाहू वाहन, दुचाकी अपघातात दोन ठार
ठळक मुद्दे सायंकाळी दुचाकी क्र. एमएच २८ बीजे ३६०६ ने बिबी गावाकडे परत येत हाेते. मालवाहू वाहन क्र. एमएच २१ बीएच १२३२ ने त्यांच्या दुचाकीस जबर धडक दिली.