लोकमत न्यूज नेटवर्क संग्रामपूर : तालुक्यातील टुनकी येथे दोन गटात हाणामारी झाल्याची घटना मंगळवारी सायंकाळी घडली. यामध्ये सात जण जखमी झाले असून तीन जण गंभीर आहेत.टुनकी येथील एका समाजातील युवकाचे लग्न कारला (ता.तेल्हारा) येथे लागले. त्यानंतर टुनकी येथे संध्याकाळी परत आल्यानंतर जुन्या वादावरुन दोन गटात चांगलीच हाणामारी झाली. पोलिसांनी आरोपींविरुद्ध कलम ३२४, ५०४, ३४ भादंविनुसार गुन्हा दाखल केला आहे. हाणामारीत जखमी झालेल्यांवर सोनाळा प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करण्यात आले असून गंभीर जखमींना अकोला येथे हलविण्यात आले.
टुनकी येथे दोन गटात हाणामारी; सात जखमी
By admin | Updated: May 24, 2017 02:03 IST