मोताळा: भरधाव वेगात मोताळय़ाकडे प्रवासी घेवून येणार्या अँटोला एस.टी.बसने धडक दिल्याने अँटोचालकासह एक प्रवासी जखमी झाले. हा अपघात बुलडाणा-मलकापूर मार्गावर चिंचपूर फाट्याजवळ मंगळवारी सकाळी ९ वाजेच्या सुमारास घडला. भरधाव वेगात जाणार्या चिखली नाशिक एसटी बस क्रमांक(एम.एच.४0 एन ९७0६) हिने समोरून येणार्या अँटो क्रमांक एम.एच.२८ सी ९२२४ ला चिंचपूर फाट्यासमोर जोरदार धडक दिली. या अपघातात अँटो चालकासह चिंचपूर येथील सुरेश प्रल्हाद मापारी यांच्या हातापायासह छाती व डोक्याला गंभीर मार लागला. जखमींना तातडीने प्रथम डॉ महाजन यांच्या रूग्णालयात प्रथमोपचार करून बुलडाणा येथील डॉ कदम यांच्या हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आल्याची माहिती असून संध्याकाळी सुरेश प्रल्हद मापारी यांची प्रकृती गंभीर असल्यामुळे त्यांना औरंगाबाद येथे पुढिल उपचारासाठी हलविण्यात आले आहे. अँटो चालक असलमखान बुढनखान रा.मोताळा यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी एस.टी.बस चालक प्रदीप वासुदेव शेगोकार वय ३१ रा.खामखेड यांच्याविरूद्ध कलम २७९, ३३७,३३८ भादंविसह मोटारवाहन कायदा १८४ नुसार गुन्हा दाखल करून चालकास अटक केली आहे. पुढिल तपास पोहेकाँ गजानन वाघ करीत आहे.
एसटी बसची अँटोला धडक दोन गंभीर जखमी
By admin | Updated: June 18, 2014 00:39 IST