लोकमत न्यूज नेटवर्कसंग्रामपूर : तालुक्यातील करमोडा शिवारातील एका शेतकर्याच्या शेतातील विहिरीत मृतावस्थेत अस्वल आढळून आल्याची घटना ३१ ऑक्टोबर रोजी रात्री १0 वाजेदरम्यान उघडकीस आली, तर ३१ ऑक्टोबर रोजीच टुनकी शिवारातसुद्धा दुसर्या अस्वलाचा मृत्यू झाला होता. दोन दिवसांतच दोन अस्वलांचा मृत्यू झाल्यामुळे परिसरात उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे.करमोडा शिवारातील प्रतीक पुरुषोत्तम राठी यांच्या गट नं. २७ या शेतशिवारात ३१ ऑक्टोबर रोजीच्या रात्री १0 वाजेदरम्यान शेता तील विहिरीत अस्वल दिसून आले. या घटनेची माहिती वन विभागाला संबंधित शेतकर्याने दिली. मिळालेल्या माहितीवरून सहायक वनपरीक्षेत्र अधिकारी एस.बी. खान हे घटनास्थळी पोहचल्यानंतर विहिरीत मृतावस्थेत पडलेल्या अस्वलाला बाहेर काढण्यात आले. १ नोव्हेंबर रोजी एन.एस. कांबळे वनपरीक्षेत्र अधिकारी जळगाव जामोद, वनरक्षक बागरे, एम.डी. गवळी, व्ही.एस. उंबरहंडे आदी घटनास्थळी दाखल झाले. मृत अस्वलाचा पंचनामा करून अस्वलाचे शवविच्छेदन करण्यात आले. त्यानंतर अस्वलावर अंत्यसंस्कार करण्यात आले. दोन दिवसांत वेगवेगळ्या घटनात दोन अस्वलांचा मृत्यू झाल्यामुळे वन्यप्रेमींनी नाराजी व्यक्त केली आहे.
४८ तासांत दोन अस्वलांचा मृत्यू!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2017 01:33 IST
संग्रामपूर : तालुक्यातील करमोडा शिवारातील एका शेतकर्याच्या शेतातील विहिरीत मृतावस्थेत अस्वल आढळून आल्याची घटना ३१ ऑक्टोबर रोजी रात्री १0 वाजेदरम्यान उघडकीस आली, तर ३१ ऑक्टोबर रोजीच टुनकी शिवारातसुद्धा दुसर्या अस्वलाचा मृत्यू झाला होता. दोन दिवसांतच दोन अस्वलांचा मृत्यू झाल्यामुळे परिसरात उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे.
४८ तासांत दोन अस्वलांचा मृत्यू!
ठळक मुद्देशेतातील विहिरीत मृतावस्थेत अस्वल आढळून आल्याची घटना ३१ ऑक्टोबर रोजी उघडकीस १ ऑक्टोबर रोजीच टुनकी शिवारातसुद्धा दुसर्या अस्वलाचा मृत्यू झाला होता