शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

बुलढाणा जिल्ह्यात लम्पी स्कीनमुळे दोन जनावरांचा मृत्यू

By भगवान वानखेडे | Updated: September 8, 2022 16:20 IST

जिल्ह्यातील पशुधनासाठी घातक संकट समजल्या जाणाऱ्या 'लम्पी स्किन' या आजाराचा जिल्ह्यातील प्रादुर्भाव झाला असून, आतापर्यंत ८९ जनावरांना याची लागण झाली आहे. यातील दोघांचा मृत्यू झाल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे.

बुलढाणा :

जिल्ह्यातील पशुधनासाठी घातक संकट समजल्या जाणाऱ्या 'लम्पी स्किन' या आजाराचा जिल्ह्यातील प्रादुर्भाव झाला असून, आतापर्यंत ८९ जनावरांना याची लागण झाली आहे. यातील दोघांचा मृत्यू झाल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे.

या आजाराने शेगाव, देऊळगाव राजा, सिंदखेड राजा, मलकापूर, जळगाव व मोताळा या तालुक्यापर्यंत शिरकाव केला आहे. शेगाव तालुक्यात सर्वाधिक जनावरे बाधित झाली आहे. याशिवाय देऊळगाव राजा व जळगाव जामोद, मलकापूर, मोताळा अशी तालुकानिहाय बाधित जनावरांची संख्या आहे. सिंदखेड राजातही आजाराचा प्रादुर्भाव झाला असून, त्याचा अहवाल मिळणार असल्याचे पशुसंवर्धन विभागाचे सहाय्यक आयुक्त डॉक्टर आर.एस. पाटील यांनी सांगितले. आजअखेर दोन जनावराचा मृत्यू झाल्याची माहितीही त्यांनी दिली.

गुरांचे बाजार तुर्तास बंदलसीकरणाला गती देण्यात आली आहे. आयुक्त आणि जिल्हाधिकारी एस.रामामुर्ती यांच्या मार्गदर्शनात व बाजार समित्यांच्या सहकार्याने तूर्तास गुरांचे बाजार बंद ठेवण्यात आले आहे. यामध्ये देऊळगावराजा, खामगाव , मोताळा, मलकापूर, चिखली , आसलगाव(जळगाव) दुधा( बुलढाणा,) या मुख्य बाजारांचा समावेश आहे. अधिनस्थ अधिकारी, कर्मचारी व पशु चिकित्सा केंद्रांना सतर्क करण्यात आल्याचे डॉ. पाटील यांनी स्पष्ट केले.

४९ जनावरे आजारातून बरेजिल्हा पशुसंवर्धन विभागाने दिलेल्या माहितीनुसार, जिल्ह्यात ८९ जनावरे लम्पी स्किनने बाधित झाले आहेत. यापैकी ४० जनावरांवर उपचार सुरु असून,४९ जनावरे उपचारानंतर बरे झाले आहेत. तर आतापर्यंत ८ हजार ५०० जनावरांचे लसीकरण झाले असून, पुढील दिवसांसाठी जिल्हा परिषद आणि पशुसंवर्धन विभागाकडून लस मागविण्यात आली आहे.

पशुपालकांनी या दिवसांत गुरांची काळजी घेणे गरजेचे आहे. हा आजार संसर्गजन्य असल्याने पशुसंवर्धन विभागाकडून सांगितलेल्या सुचनाचे पालन करावे.-डॉ. राजेंद्र पाटील, सहाय्यक पशुसंवर्धन अधिरारी, बुलढाणा.